पवारांच्या प्रशंसेचा अर्थ ठाकरेंच्या लक्षात आलाय…

पवारांच्या प्रशंसेचा अर्थ ठाकरेंच्या लक्षात आलाय... | Dinesh Kanji | Sharad Pawar | Eknath Shinde |

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिल्लीत आयोजिक केलेल्या अखिल भारतीय साहीत्य संमेलनात केलेल्या एकनाथ स्तुतीमुळे खळबळ निर्माण झाली आहे. किंबहुना, खळबळ निर्माण करण्यासाठीच पवारांनी ही स्तुती केली असावी, असेही काहींचे म्हणणे आहे. पवारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाराज झाले. संजय राऊत बिथरले. ‘हे साहीत्य संमेलन नसून दलालांचे संमेलन आहे’, असा दावा करून त्यांना तमाम साहीत्यिकांना दलाल ठरवले. पवारांना याच्याशी काही घेणे-देणे नसावे, त्यांना जे काही साध्य करायचे ते त्यांनी करून टाकले.

Exit mobile version