टोमणेबाईंची तडफड, फडफड सांगतेय, डील फिस्कटले…

टोमणेबाईंची तडफड, फडफड सांगतेय, डील फिस्कटले... | Dinesh Kanji | Uddhav Thackeray | Aditya Thackeray

मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या देवेंद्र फडणवीसांना लोटांगण घालून पाहीले, भेटून त्यांना गुळ लावण्याचा प्रयत्न केला. परंतु उपयोग झाला नसावा. मनासारखे डील झाले नसावे. बहुधा फडणवीसांनी गालातल्या गालात हसत वाटाण्याच्या अक्षता लावल्या आणि चहा पाजून रवाना केले. यापेक्षा काही वेगळे झाले असण्याची शक्यता नाही. तीच तडफड, फडफड पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उर्फ टोमणेबाई यांच्या भाषणातून काल शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनी मुखातून बाहेर पडली. ज्यांचे चड्डी बनियान सुद्धा स्वकष्टाचे नाहीत, त्यांनी संघावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण कडेलोट झाल्याशिवाय धडा घ्यायचा नाही, अशी प्रतिज्ञाच बहुधा ठाकरेंनी घेतलेली आहे.

Exit mobile version