मायक्रोसॉफ्टमुळे ईस्ट इंडीया कंपनीची आठवण का होतेय ?

मायक्रोसॉफ्टमुळे ईस्ट इंडीया कंपनीची आठवण का होतेय ? Dinesh Kanji | Microsoft | Nayara

लोकशाहीच्या नावाखाली जिथे तिथे युद्ध लादणाऱ्या अमेरिकेचे खूनशी अंतरंग अवघ्या जगाला ठाऊक आहेत. अमेरिकी कंपन्याही या आक्रमकवादात मागे नाहीत. अमेरिकेचे धोरण रेटण्यासाठी वेळ पडल्यास आंतरराष्ट्रीय नियम धाब्यावर बसवण्याचीही या कंपन्यांची तयारी असते. भारतात ज्या सॉफ्टवेअरचा आपण सगळेच घाऊक प्रमाणात वापर करतो त्या मायक्रोसॉफ्टने भारताला रंग दाखवलेले आहेत. या कंपनीने नव्याने दाखवून दिले आहे की अमेरिकी कंपन्यांच्या सेवा वापरणे म्हणजे विषारी साप गळ्यात घेऊन फिरण्यासारखे आहे. हा साप कधीही डंख मारू शकतो. व्यापाराच्या नावाखाली हातपाय पसरायचे आणि राजकारणात ढवळाढवळ करायची, हे इस्ट इंडीया कंपनीचे तंत्र पुन्हा एकदा भारतात वापरले जाते आहे की काय, अशी शंका यानिमित्ताने येते आहे.

Exit mobile version