29.8 C
Mumbai
Wednesday, October 28, 2026
घरविशेष‘अर्णब’ चक्रीवादळाचा आंध्र प्रदेश-ओडिशाला तडाखा

‘अर्णब’ चक्रीवादळाचा आंध्र प्रदेश-ओडिशाला तडाखा

३० हजार नागरिकांचे स्थलांतर

Google News Follow

आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर ‘अर्णब’ या अत्यंत तीव्र चक्रीवादळाने २८ ऑक्टोबर रोजी पहाटे धडक दिल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव ओडिशामध्येही जाणवत असून, दक्षिण ओडिशातील सहा जिल्ह्यांसाठी भारतीय हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन ओडिशामध्ये ३० हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकत असताना वाऱ्याचा वेग ताशी १२५ ते १३५ किलोमीटर होता, तर वाऱ्याचे झोत ताशी १५० किलोमीटरपर्यंत पोहोचले. मुसळधार पाऊस, जोरदार वारे आणि समुद्राच्या उंच लाटांमुळे किनारपट्टीवरील भागांमध्ये सतर्कता वाढवण्यात आली आहे.

चक्रीवादळामुळे विशाखापट्टणममध्ये शेकडो झाडे उन्मळून पडली असून, रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. पडलेली झाडे हटवून रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्याचे काम महापालिकेच्या पथकांकडून सुरू आहे. चक्रीवादळाचा विमानसेवेवरही परिणाम झाला असून, विजयवाडा आणि विशाखापट्टणम येथील किमान २१ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. आंध्र प्रदेशच्या काही भागांत मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. काकीनाडा जिल्ह्यात पुराच्या पाण्यात अडकलेल्या चार जणांची पोलिसांनी सुरक्षित सुटका केली. मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी प्रशासनाचा आढावा घेत बाधित भागांतील परिस्थिती लवकर पूर्ववत करण्याचे निर्देश दिले आहेत. पावसामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचेही वृत्त आहे.
हे ही वाचा:
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ

सरन्यायाधीशांवरील वादग्रस्त पोस्टप्रकरणी केरळ काँग्रेसचा माफीनामा

स्पेनमध्ये दोन हायस्पीड ट्रेन आदळून ३० ठार

अर्शदीप-सँटनरला १५० बळींचा टप्पा खुणावतोय

ओडिशामध्ये गंजाम, गजपती, रायगडा, कोरापुट, मलकानगिरी आणि नबरंगपूर या सहा जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जोरदार वाऱ्यांमुळे झाडे उन्मळून पडणे, सखल भागांत पाणी साचणे आणि वाहतुकीत अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याची मोहीम राबवली असून, चक्रीवादळ निवारागृहांमध्ये अन्न, पिण्याचे पाणी आणि आवश्यक सुविधांची व्यवस्था केली आहे. आपत्ती व्यवस्थापन पथके आणि अग्निशमन दलाला सतर्क ठेवण्यात आले आहे. काही जिल्ह्यांमध्ये शाळा आणि अंगणवाड्या बंद ठेवण्यात आल्या असून, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

‘अर्णब’ हे नाव बांगलादेशाने सुचवले असून, बंगाली भाषेत त्याचा अर्थ महासागर किंवा समुद्र असा होतो. चक्रीवादळाची तीव्रता कमी होण्याची शक्यता असली, तरी आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये अतिवृष्टीचा धोका कायम आहे. मुसळधार पावसामुळे पूरस्थिती, वीजपुरवठा खंडित होणे आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, अनावश्यक प्रवास टाळावा आणि पूरग्रस्त भागांपासून दूर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा