कोळसा मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की वाणिज्यिक कोळसा ब्लॉक्सच्या लिलावाच्या १४व्या फेरीत २४ कोळसा ब्लॉक्ससाठी एकूण ४९ बोली प्राप्त झाल्या आहेत. कोळसा मंत्रालयाच्या निवेदनानुसार, नामनिर्दिष्ट प्राधिकरणाने वाणिज्यिक कोळसा ब्लॉक्सच्या १४व्या टप्प्यासाठी बोली मागविल्या होत्या. या बोली प्रक्रियेत उद्योग क्षेत्रातील भागधारकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. या फेरीत एकूण ४१ ब्लॉक्सपैकी २४ ब्लॉक्ससाठी बोली प्राप्त झाल्या असून यावरून देशातील वाणिज्यिक कोळसा खाण संरचनेबाबत उद्योग क्षेत्राची सततची रुची स्पष्ट होते.
मंत्रालयाने पुढे सांगितले की ऑनलाइन बोली डिक्रिप्ट करून बोलीदारांच्या उपस्थितीत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने उघडण्यात आल्या. त्यानंतर ऑफलाइन बोली दस्तऐवज असलेले सीलबंद लिफाफेही बोलीदारांच्या उपस्थितीत उघडण्यात आले. संपूर्ण पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया बोलीदारांसाठी स्क्रीनवर थेट (लाईव्ह) दाखवण्यात आली. या फेरीत एकूण ४१ कोळसा ब्लॉक्सपैकी २४ ब्लॉक्ससाठी ४९ बोली प्राप्त झाल्या आहेत. या लिलाव प्रक्रियेत वाणिज्यिक कोळसा खाण व्यवस्थेखाली प्रथमच बोली लावणाऱ्या ५ नवीन कंपन्यांसह एकूण ११ कंपन्यांनी सहभाग घेतला. नवीन कंपन्यांचा सहभाग धोरणात्मक चौकटीवरील वाढता विश्वास आणि देशातील कोळसा क्षेत्रातील वाढत्या संधी दर्शवतो. भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने पुढे जात असताना, कोळसा क्षेत्र आर्थिक गतीचा एक महत्त्वाचा चालक ठरत आहे.
हेही वाचा..
शबरीमाला प्रकरण : एसआयटीचा तपास आता चेन्नई आणि बेल्लारीपर्यंत
उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांच्यासह केंद्रीय मंत्र्यांनी इस्रोचे केले अभिनंदन
‘ऑपरेशन डेव्हिल हंट फेज-२’ पुन्हा सुरू
‘ऑपरेशन डेव्हिल हंट फेज-२’ पुन्हा सुरू
मंत्रालयाच्या माहितीनुसार, आता बोलींचे मूल्यांकन बहुविषयक तांत्रिक मूल्यांकन समितीकडून करण्यात येणार आहे. तांत्रिकदृष्ट्या पात्र ठरलेल्या बोलीदारांना एमएसटीसी पोर्टलवर होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक लिलावात सहभागी होण्यासाठी शॉर्टलिस्ट केले जाईल. वाणिज्यिक कोळसा ब्लॉक्सच्या लिलावाला मिळणारा सातत्यपूर्ण सकारात्मक प्रतिसाद औद्योगिक विकासाला पाठबळ देणे, ऊर्जा सुरक्षा मजबूत करणे आणि भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनविण्यात योगदान देण्यामध्ये कोळसा क्षेत्राची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करतो.







