31 C
Mumbai
Monday, October 26, 2026
घरविशेषदिवाळीपूर्वी भेसळखोरांवर तुकाराम मुंढेंची धडक कारवाई

दिवाळीपूर्वी भेसळखोरांवर तुकाराम मुंढेंची धडक कारवाई

१६.९२ कोटींचा संशयास्पद साठा जप्त

Google News Follow

दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यभरात भेसळखोरांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत आतापर्यंत १६ कोटी ९२ लाख रुपये किमतीचा संशयास्पद अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६८ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, सात उत्पादन युनिट्स बंद करण्यात आली आहेत. याशिवाय २२ गुन्हे दाखल करण्यात आले असून, २० जणांना अटक करण्यात आली आहे.

दिवाळीच्या काळात मिठाई, खवा, मावा, दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल आणि फराळाच्या पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. या वाढत्या मागणीचा गैरफायदा घेऊन भेसळयुक्त, निकृष्ट दर्जाचे किंवा मुदतबाह्य पदार्थांची विक्री होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने तपासणीचा वेग वाढविला आहे. मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या सहा विभागांत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या कारवाईदरम्यान ८ हजार ३९२ किलो मुदतबाह्य आणि खराब झालेला अन्नसाठा जप्त करून नष्ट करण्यात आला. यापूर्वी नवरात्रोत्सवाच्या काळातही ९ कोटी ११ लाख रुपये किमतीचा संशयास्पद अन्नसाठा जप्त करण्यात आला होता.
हे ही वाचा:
अरुणाचल प्रदेशात आंदोलकांकडून भाजप प्रदेशाध्यक्षांच्या घराची तोडफोड

‘तिसरी मुंबई’बनेल महाराष्ट्राचे ग्रोथ इंजिन

गंगेवर राफेल-सुखोईचा थरार; सूर्यकिरण पथकाकडून आकाशात तिरंग्याची उधळण!

जळगावमध्ये संघाच्या पथसंचलनावर दगडफेक

प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या बेकायदेशीर विक्रीविरोधातही प्रशासनाने कारवाई केली असून, या मोहिमेत ३ कोटी १५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विभागनिहाय कारवाईत छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक ४ कोटी १९ लाख रुपये किमतीचा संशयास्पद अन्नसाठा जप्त करण्यात आला. दरम्यान, सोलापूर विभागातील एफडीएच्या पथकाने पुणे-पंढरपूर मार्गावरील माळशिरसजवळ कारवाई करत १ हजार ३३७ किलो संशयित खवा जप्त केला. धाराशिव जिल्ह्यातील तीन उत्पादकांकडून तयार करण्यात आलेला हा खवा सातारा येथील घाऊक आणि किरकोळ व्यापाऱ्यांकडे पाठविला जात होता.

वाहतुकीदरम्यान अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन झाले नसल्याचे तपासणीत आढळल्याने आणि खव्याच्या गुणवत्तेबाबत संशय निर्माण झाल्याने सुमारे ४ लाख ८१ हजार रुपये किमतीचा संपूर्ण साठा नष्ट करण्यात आला. दिवाळीपर्यंत ही तपासणी मोहीम सुरू राहणार असून, मिठाई, खवा, मावा, दुग्धजन्य पदार्थ, खाद्यतेल आणि तयार फराळाच्या नमुन्यांची तपासणी केली जाणार आहे. अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणे, निकृष्ट दर्जाचे पदार्थ विकणे किंवा अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणे आढळल्यास संबंधितांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा