28.7 C
Mumbai
Saturday, May 2, 2026
घरविशेषबारावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल तर मुलींची बाजी!

बारावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल तर मुलींची बाजी!

राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के

Google News Follow

Related

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा (HSC) निकाल जाहीर झाला. राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के लागला असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंग आणि राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

माहितीनुसार, यंदा राज्याचा निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे दोन टक्क्यांनी घटला आहे. राज्यात एकूण १४ लाख ५८ हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. राज्यात ९४.१४ टक्क्यांसह कोकण विभाग अव्वल ठरला आहे. यंदाच्या निकालात पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारल्याचे चित्र आहे. बारावीचा एकूण निकाल ८९.७९ टक्के लागला असून त्यात ९३.१५ टक्के मुली तर ८६.८० टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. बारावीच्या निकालात लातूर विभाग सर्वात मागे राहिला आहे. लातूरमध्ये ८४.१४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

हे ही वाचा:

कलिंगड प्रकरण: घरातून गोळा केलेल्या अन्नाच्या ११ नमुन्यांमध्ये विष नाही

जबलपूर दुर्घटना: बोट बुडायला लागल्यानंतर लाईफ-जॅकेटची शोधाधोध केली

जर्मनीतून ५,००० अमेरिकन सैनिकांना माघारी बोलावणार

४ वर्षीय चिमुरडीची अत्याचारानंतर हत्या; ६५ वर्षीय आरोपी अटकेत

राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी सांगितले की, फेब्रुवारी-मार्चमध्ये एकूण १५३ विषयांची परीक्षा घेण्यात आली होती. यंदाही मुलींनी बाजी मारत ९३.१५ टक्के उत्तीर्णता मिळवली, तर मुलांचा निकाल ८६.८० टक्के लागला. गेल्या वर्षाच्या तुलनेत निकालात सुमारे २ टक्क्यांची घट झाली आहे. शाखानिहाय निकालात विज्ञान शाखा ९६.४४ टक्क्यांसह अव्वल ठरली. वाणिज्य शाखेचा निकाल ८७.०३ टक्के, तर कला शाखेचा निकाल ७८.०२ टक्के लागला आहे. विभागनिहाय निकालात कोकण विभाग ९४.१४ टक्क्यांसह प्रथम क्रमांकावर आहे, तर लातूर विभागाचा निकाल ८४.१४ टक्के असून तो सर्वात कमी आहे.

बारावीचा विभागनिहाय निकाल

  • मुंबई – ९०.०८ टक्के
  • कोकण – ९४.१४ टक्के
  • पुणे – ९१.२५ टक्के
  • नागपूर – ८८.६७ टक्के
  • अमरावती ९०.९२ टक्के
  • नाशिक ९०.७२ टक्के
  • लातूर ८४.१४ टक्के
  • छत्रपती संभाजीनगर ८८.६८ टक्के
  • कोल्हापूर ८९.९७ टक्के
National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
304,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा