29.6 C
Mumbai
Friday, October 23, 2026
घरविशेषदक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस

दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस

११ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Google News Follow

राज्यात गेल्या काही दिवसांपासून ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम असतानाच दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. शनिवारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस झाला. सांगली जिल्ह्यातील तासगाव, मिरज आणि कवठेमहांकाळ तालुक्यांत पावसाच्या सरी कोसळल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने रविवारी राज्यातील ११ जिल्ह्यांना वादळी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा घाट विभाग, कोल्हापूर, कोल्हापूर घाट विभाग, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड आणि हिंगोली या भागांत मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात काही ठिकाणी ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याचा अंदाज आहे. रायगड, पुणे, पुणे घाट विभाग, सातारा, बीड आणि परभणी या भागांतही हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हे ही वाचा:
हा विरोध एसआयआरला नाही, लोकशाहीलाच आहे!

फ्रान्स जळू लागला…५ लाख लोक रस्त्यावर… दुकाने लुटली…जुन्या वास्तू पेटवल्या

गोव्यात ३०० कॉक्रोच आंदोलकांवर गुन्हे

आयपीओपूर्वी रिलायन्स जिओची मोठी तयारी
बंगालच्या उपसागरातून आणि अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यातील वातावरणात आर्द्रता वाढली आहे. त्यामुळे काही भागांत दुपारी आणि संध्याकाळच्या वेळी पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. मात्र, हा पाऊस सर्वदूर पडण्याऐवजी तुरळक भागांतच नोंदवला जात आहे. पुढील दोन दिवस राज्यातील काही भागांत पावसाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, यंदा राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने अनेक भागांत पाणीटंचाई आणि दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सप्टेंबरमध्येही पावसाचे प्रमाण कमी राहिले, तर ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून तापमानात वाढ झाल्याने नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत पावसाच्या पुनरागमनामुळे काही भागांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा