34 C
Mumbai
Thursday, November 12, 2026
घरविशेषयूपीमध्ये दलित-मुस्लिमांच्या मतासाठी ओवैसी-आझाद युती

यूपीमध्ये दलित-मुस्लिमांच्या मतासाठी ओवैसी-आझाद युती

यूपी निवडणुकीआधी तिसऱ्या आघाडीची घोषणा

Google News Follow

आगामी २०२७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात आज गुरुवारी (१२ नोव्हेंबर २०२६) एक मोठे समीकरण उदयास आले आहे. आझाद समाज पार्टीचे (कांशीराम) अध्यक्ष व खासदार चंद्रशेखर आझाद आणि ‘एआयएमआयएम’चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची अधिकृत घोषणा केली आहे. महाराष्ट्रात ओवैसी आणि प्रकाश आंबेडकर यांनी दलित-मुस्लिमांना एकत्र आणण्याचा जो प्रयोग केला होता, तोच प्रयोग ओवैसी आणि चंद्रशेखर आझाद उत्तर प्रदेशात करत आहेत.

ही तिसरी आघाडी नसून पहिली मजबूत आघाडी आहे, असे आझाद म्हणाले. मोठ्या आघाडीत सहभागी होण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण त्याला कमकुवत समजले गेले. आता आम्ही अपमान सहन करणार नाही. भाजपला पराभूत करण्यासाठी समाजवादी पक्ष आणि काँग्रेसनेही या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन आझाद यांनी केले. आझाद पुढे म्हणाले, सध्या यात दोन पक्ष असले तरी जसजसे शोषित, पीडित आणि वंचित घटक याच्याशी जोडले जातील, तसतसा हा मोर्चा अधिक मजबूत होत जाईल.

या मोर्चाच्या माध्यमातून २६ नोव्हेंबर रोजी लखनौच्या रमाबाई आंबेडकर मैदानावर भव्य ‘सत्ता परिवर्तन रॅली’ आयोजित केली जाणार असून, आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्व ४०३ जागा लढवण्याची तयारी असल्याचे आझाद यांनी सांगितले. तसेच, भाजपला रोखण्यासाठी इतर समविचारी पक्षांनी सोबत यायचे असल्यास त्यांचे स्वागतच असेल, असेही त्यांनी नमूद केले.

हे ही वाचा:

मुंबईवर पाणीटंचाईचे सावट? आठ वर्षांतील नीचांकी साठा

बदरकूटच्या जंगलातून दोन हँड ग्रेनेड जप्त

मुंबईतील रेल्वे स्थानकांवर वाजवली भोजपुरी गाणी

अभिषेक बॅनर्जींच्या घराबाहेरील अतिक्रमणावर बुलडोझर कारवाई

असदुद्दीन ओवैसी यांनी चंद्रशेखर आझाद हे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील, अशी घोषणा केली. राज्यात भाजपला रोखण्यासाठी सामाजिक परिवर्तन मोर्चा हा मजबूत पर्याय असेल, असे ओवैसी म्हणाले. आतापर्यंत त्यांच्या समाजातील लोकांचा वापर फक्त मतदार म्हणून करण्यात आला आहे, असे सांगतानाच आता ही आघाडी आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न असेल, असेही त्यांनी सांगितले. सामाजिक परिवर्तन मोर्चा राज्यातील सर्वच्या सर्व जागांवर निवडणूक लढवणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. “आम्ही भूतकाळाचे नाही तर भविष्याचे राजकारण करणार आहोत. बेरोजगार तरुण, शेतकरी आणि मागासवर्गीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी हा मोर्चा कटिबद्ध आहे.” असे असदुद्दीन ओवैसी म्हणाले.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा