मणिपूरमध्ये हिंसाचार सुरूच, एका निदर्शकाचा मृत्यू, २५ जण जखमी!

२७ पोलीसही जखमी 

मणिपूरमध्ये हिंसाचार सुरूच, एका निदर्शकाचा मृत्यू, २५ जण जखमी!

मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. शनिवारी (८ मार्च) कांगपोक्पी जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात कुकी निदर्शक आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या संघर्षात एका निदर्शकाचा मृत्यू झाला आणि महिलांसह २५ जण जखमी झाले, अशी अधिकाऱ्यांनी माहिती दिली. मृताचे नाव लालगौथांग सिंगसित असे आहे. पोलिसांनी सांगितले की, ३० वर्षीय सिंगसिटला कीथेलमॅनबी येथे झालेल्या संघर्षादरम्यान गोळी लागली आणि रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, गामगीफाई, मोटबुंग आणि कीथेलमनबी येथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत किमान २५ निदर्शकांना विविध प्रमाणात दुखापत झाली आणि त्यांना जवळच्या सार्वजनिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

कुकी आणि मेईतेई भागांसह मणिपूरमध्ये सर्व वाहनांना मुक्तपणे हालचाली करण्यास परवानगी देण्याच्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निर्देशाचे स्थानिकांनी उल्लंघन केले आणि संघर्ष झाला. सरकारच्या या निर्णयाच्या निषेधार्थ कुकी समुदायाच्या लोकांनी इतका गोंधळ घातला. पोलिसांनी त्यांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतर कुकीबहुल जिल्ह्यात निदर्शक आणि सुरक्षा दलांमध्ये संघर्ष झाला.

आंदोलकांनी खाजगी वाहने जाळली आणि इंफाळहून सेनापती जिल्ह्यात जाणारी राज्य परिवहन बस थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा परिस्थिती आणखी बिकट झाली. आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २ (इंफाळ-दिमापूर महामार्ग) देखील रोखला आणि सरकारी वाहनांच्या हालचालीत अडथळा आणण्यासाठी टायर जाळले. कांगपोक्पी जिल्ह्यात, विशेषतः राष्ट्रीय महामार्ग २ वरील भागात तणाव वाढू लागल्याने, स्थानिक अधिकाऱ्यांनी कर्फ्यू लागू करण्यात आला होता.

हे ही वाचा  : 

उपराष्ट्रपती जगदीप धनखड एम्समध्ये दाखल: छातीत तीव्र वेदना आणि अस्वस्थतेच्या तक्रारी!

उपराष्ट्रपती जगदीप धनखड एम्समध्ये दाखल: छातीत तीव्र वेदना आणि अस्वस्थतेच्या तक्रारी!

अनिल परब चक्क संभाजी महाराजांच्या पंगतीत जाऊन बसले!

चांदा ते बांदा…. आंदोलनजीवी नेत्यांनाही मकोका लावणार काय?

दुसरीकडे, या घटनेत २७ पोलिसही जखमी झाले आहेत. पोलिसांच्या निवेदनात म्हटले आहे की, “आंदोलकांमधील सशस्त्र गुंडांनी केलेल्या जोरदार दगडफेक, गोफणीचा वापर आणि अंदाधुंद गोळीबारामुळे २७ सुरक्षा दलाचे कर्मचारी जखमी झाले, त्यापैकी २ सुरक्षा दलाचे कर्मचारी गंभीर जखमी झाले. सुरक्षा दलांच्या दोन वाहनांनाही आग लावण्यात आली.

 

Exit mobile version