एसटी आंदोलनावेळी १०० दारुडे पवारांच्या घरी घुसले!

जितेंद्र आव्हाडांनी सांगलीत केले वक्तव्य

एसटी आंदोलनावेळी १०० दारुडे पवारांच्या घरी घुसले!

गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांच्यातील वाद हे सध्या महाराष्ट्रातील राजकारणात चर्चेचा विषय ठरले आहेत. या वादामुळे सांगली जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. याच पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांच्या समर्थनार्थ काल (२२ सप्टेंबर) सांगलीत मविआकडून महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात राष्ट्रवादीचे नेते, मुंब्रा-कळवा विधानसभा मतदार संघाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित होते. यावेळी आव्हाड यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली आणि शरद पवारांच्या घरात माणसं घुसवण्याच्या घटनेचा प्रसंगही सांगितला.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, कसला सुसंस्कृत पक्ष? यांचा खरा चेहरा बाहेर पडतोय. बलाढ्य नेत्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून त्यांना बदनाम करून त्यांना छोटे करण्याचे काम सुरू आहे. आणि याची सुरुवात आज नाही झाली. याच टोळीमधील एकाने शरद पवारांच्या घरी माणसे घुसवली होती. एसटीचे आंदोलन चालू होते आणि १०० दारुडे शरद पवारांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करत होते. शरद पवारांची नात गॅलरीत आली नसती आणि तिने जर खालून धावत येणारी माणसे बघितली नसती तर प्रसंग काय ओढवला असता हे मी वेगळ सांगायला नको.

ते पुढे म्हणाले, माझ्या हातून जरी एखादे वाक्य चुकीचे वाक्य बाहेर पडले तर गाडीमध्ये बसूपर्यंत शरद पवारांचा फोन येईल आणि ‘माजलास काय रे?’ असा प्रश्न विचारला जाईल. नेतृत्वाची भीती कार्यकर्त्यांमध्ये असायलाच हवी, पण कार्यकर्त्यांमध्ये ती भीती संपली आहे.

हे ही वाचा : 

कब्रस्तानात महिलांच्या कबरी खोदल्या; मृतदेहांवर घृणास्पद कृत्याची शक्यता!

जोधपूरमध्ये जागतिक शांती महायज्ञाचा शुभारंभ

‘काँग्रेसच्या अहंकारी मानसिकतेचे खळबळजनक वास्तव उघड’

आयुष्मान भारत योजनेची सात वर्षे पूर्ण

ही राज्याची संस्कृती आहे?. एका ८५ वर्षीय म्हाताऱ्याच्या (शरद पवार) घरात म्हातारा-म्हातारी असताना. जर काही बरं वाईट झालं असतं तर राज्याला काय तोंड दाखवलं असतं. महाराष्ट्राच्या संस्कृतीचं वाटोळ करून टाकल आहे, कोणीही उटत काहीही बोलतं, असे आव्हाड म्हणाले.

Exit mobile version