जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावताना सुरक्षा दलांनी बुधवारी (३० जुलै) दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान घातले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. नियंत्रण रेषेजवळ संशयास्पद व्यक्तींच्या हालचाली आढळल्यानंतर, पूंछच्या देघवार सेक्टरमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू आहे.
सूत्रांनी इंडिया टुडे टीव्हीला सांगितले की, दहशतवादी पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा त्यांना भारतीय सैन्याने रोखले आणि गोळ्या घालून ठार केले. ही कारवाई अजूनही सुरू आहे, परिसरात अधिक सैन्य तैनात करण्यात आले आहे.
श्रीनगरच्या बाहेरील भागात झालेल्या एका वेगळ्या चकमकीत सुरक्षा दलांनी २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा कथित सूत्रधार आणि त्याच्या दोन साथीदारांसह तीन दहशतवाद्यांना ठार मारल्यानंतर आजची चकमक घडली.
हे ही वाचा :
ठाणे – तुमच्या घरी पाणीपुरवठा नसेल तर तुम्ही ही बातमी वाचलीच पाहिजे…
Earthquake : रशियामध्ये ८.७ रिश्टर स्केलचा भूकंप, जपानपासून अमेरिकेला त्सुनामीचा इशारा
प्रणिती शिंदे म्हणतात, ऑपरेशन सिंदूर म्हणजे सरकारचा मीडियातला तमाशा
दोघींच्या गप्पा सुरु होत्या आणि अचानक महिलेच्या खांद्यात घुसली गोळी!”
सोमवारच्या कारवाईत ठार झालेल्यांमध्ये सुलेमान उर्फ आसिफचाही समावेश होता, जो पहलगाम हल्ल्याचा मुख्य योजनाकार असल्याचे सांगितले जाते. “ऑपरेशन महादेव” मोहीम राबवत सुरक्षा दलाने ही कारवाई केली. श्रीनगरमधील चकमकीत मारले गेलेले इतर दोन दहशतवाद्यांची ओळख जिब्रान आणि हमजा अफगाणी अशी झाली आहे.
त्यांच्यावर गेल्या वर्षी सोनमर्ग बोगद्यावर झालेल्या हल्ल्यात सहभागी असल्याचा आरोप आहे. चकमकीच्या ठिकाणाहून एक एम४ कार्बाइन रायफल, दोन एके रायफल आणि इतर दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.







