राज्यभरात पावसाचा धुमाकूळ सुरु असून अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागात पाणी साचल्याने अडकलेल्या नागरिकांना सुरक्षा पथकाकडून बाहेर काढले जात आहे. या अतिवृष्टीमुळे उमराळे तलाव येथील आदिवासी पाड्यावर घरांना पाण्याचा वेढा पडला असून अनेक घरांत पाणी शिरले आहे. यामुळे याठिकाणी अनेक नागरीक अडकून पडले होते. अखेर अग्निशमन दलाच्या मदतीने त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
उमराळे तलाव आणि लगतच्या आदिवासी पाड्यावर पावसामुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीत अडकलेल्या २३ आदिवासी नागरिकांना महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी काल (१९ ऑगस्ट) रात्री ८ ते ९.३० या वेळेत सुखरूप बाहेर काढले. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि महिला यांचा समावेश होता.
पाण्याची पातळी अत्यंत वाढल्याने हे नागरिक बाहेर पडू शकत नव्हते. बोट उपलब्ध नसल्याने अग्निशमन कर्मचाऱ्यांनी शारीरिक मेहनतीने, सहकाऱ्यांच्या मदतीने सर्वांना सुरक्षित स्थळी हलवले. बचावकार्यात प्रविण पाटील, सचिन राऊत, तसेच महापालिकेचे कर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थ यांचे मोलाचे योगदान लाभले. या सर्वांना महापालिकेच्या विभागीय कार्यालयात तात्पुरता निवारा व भोजन यांची व्यवस्था करण्यात आली. स्थानिक प्रशासनाच्या तात्काळ व सुसंगत प्रतिसादामुळे कोणतीही जीवितहानी टळली असून, या कामगिरीसाठी अग्निशमन दलाचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.
हे ही वाचा :
सप्त ऋषी आरतीवेळी बाबा विश्वनाथांच्या सुवर्ण शिखरावर एक पांढरं घुबड उपस्थित असतं
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला करणारा अटकेत
मोनोरेल ठप्प; काचा फोडून प्रवाशांना काढले बाहेर
केअरटेकर वयोवृद्ध दाम्पत्याला सोडून पळाला; कुर्ला पोलिसांनी दिले जीवदान!







