दहा वर्षात भारतातील गरिबांची संख्या २७.१ टक्क्यावरून ५.३ टक्के

जागतिक बँकेने जाहीर केली आकडेवारी

दहा वर्षात भारतातील गरिबांची संख्या २७.१ टक्क्यावरून ५.३ टक्के

भारतामध्ये  अत्यंत गरिबीत जगणाऱ्या लोकसंख्येत गेल्या दशकात मोठी घट झाली आहे. जागतिक बँकेने जाहीर केलेल्या नव्या आकडेवारीनुसार, ही टक्केवारी २७.१% वरून ५.३ % वर आली आहे. २०११-१२ ते २०२२-२३ या काळात भारतात अत्यंत गरिबी रेषेखाली असलेली लोकसंख्या ३४४.४७ दशलक्षांवरून ७५.२४ दशलक्षांवर आली आहे. म्हणजेच सुमारे २७ कोटी लोकांनी या काळात गरिबीमधून बाहेर येण्यात यश मिळवलं.

हे ही वाचा:

जसबीर सिंगची रिमांड दोन दिवस वाढवली

भविष्यासाठी मजबूत आणि आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा तयार करा

श्रिया पिळगांवकरने ‘छल कपट’मध्ये कशी साकारली इन्स्पेक्टरची भूमिका?

सीसीपीएचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्वयं-लेखा परीक्षणाचे निर्देश

जागतिक बँकेच्या या नव्या अहवालानुसार, गरिबी मोजण्यासाठी अधिक कठोर निकष लागू करण्यात आले असून, दररोजचा उपभोग खर्च $२.१५ वरून $३ करण्यात आला आहे आणि त्यात २०२१च्या Purchasing Power Parities (PPPs) चाही समावेश करण्यात आला आहे.

पाच राज्ये — उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश — ज्यांच्याकडे २०११-१२ मध्ये भारतातील ६५% अत्यंत गरीब लोक होते, त्यांनी २०२२-२३ पर्यंत गरिबी घटवण्यात एकूण घटाच्या दोन-तृतियांश योगदान दिले.

२०१७ च्या किंमतींवर आधारित $२.१५ च्या जुन्या गरीबी रेषेनुसार, भारतातील अत्यंत गरिबीचा दर २०११-१२ मधील १६.२% वरून २०२२-२३ मध्ये २.३ % वर खाली आला आहे.

या घसरणीचा अर्थ असा आहे की २०११-१२ मध्ये २०५.९३ दशलक्ष लोक अत्यंत गरिबीत होते, जे २०२२-२३ मध्ये ३३.६६ दशलक्ष झाले. म्हणजेच १७२ दशलक्ष लोक या गरीबी रेषेपेक्षा वर आले आहेत.

वर्ल्ड बँकेने ‘लोअर-मिडल-इन्कम’ (LMIC) वर्गासाठी गरीबी रेषा $३.६५ वरून $४.२० प्रति दिवस इतकी वाढवली आहे (२०१७ किंमतीनुसार). या नव्या निकषानुसार, भारतात या रेषेखालील लोकांचे प्रमाण २०११-१२ मध्ये ५७.७% होते, जे २०२२-२३ मध्ये घटून २३.९ % झाले आहे.

या ११ वर्षांत, LMIC गरीबी रेषेखालील लोकांची एकूण संख्या ७३२.४८ दशलक्षांवरून ३४२.३२ दशलक्षांवर आली आहे.

या बदलांनंतर, वर्ल्ड बँकेने २०२२ साठी जागतिक अत्यंत गरिबीचा दर ९% वरून १०.५% वर वाढवला आहे. परिणामी, जगभरात आंतरराष्ट्रीय गरीबी रेषेखाली जगणाऱ्या लोकांची संख्या ७१३ दशलक्षांवरून ८३८ दशलक्षांवर पोहोचली आहे.

Exit mobile version