25 C
Mumbai
Tuesday, December 9, 2025
घरविशेषकोरोना आणि ५जी चा काहीही संबंध नाही

कोरोना आणि ५जी चा काहीही संबंध नाही

Google News Follow

Related

भारतात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनं थैमान घातलं आहे. याचदरम्यान, टेलिकॉम कंपन्यांनी देशात ५जी तंत्रज्ञानाच्या टेस्टिंगसाठीच्या कामांना सुरुवात केली आहे. दुसरीकडे सोशल मीडियावर ५जी टेस्टिंगबाबत अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. व्हायरल मेसेजमध्ये देशातील कोरोनाच्या परिस्थितीला ५ जी तंत्रज्ञानाला जबाबदार धरण्यात आले आहे. अशा अनेक खोट्या बातम्या, मेसेजस फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल होत आहेत. या निराधार दाव्यांद्वारे लोकांना सतत चेतावणी दिली जात आहे. परंतु आता सरकार याबाबत अधिकच कठोर बनत आहे.

गेल्या काही दिवसांपासून ५ जी नेटवर्कमुळे कोरोना पसरत असल्याच्या अफवा पसरत आहेत. हरियाणात तर या अफवांचं पेव फुटलं आहे. त्यामुळे हरियाणाचे मुख्य सचिव विजय वर्धन यांनी या अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. अशा प्रकारच्या अफवा पसरविल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराच विजय वर्धन यांनी दिला आहे. तसेच देशात अजून ५ जीची टेस्टिंगच सुरू झाली नसल्याचंही वर्धन यांनी स्पष्ट केलं आहे.

यापूर्वी, मोबाईल टेलिकॉम सेवा प्रदात्यांचं व्यासपीठ असलेल्या सीओएआयने अशी मागणी केली आहे की, ५ जी टेक्नोलॉजी हे कोरोना साथीच्या प्रसाराचे कारण असल्याचे सांगून बनावट आणि दिशाभूल करणारे मेसेज सोशल मीडियावार पसरवले जात आहेत, ते त्वरित हटवावेत. सीओएआयने यासंदर्भात माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाला पत्र लिहिले आहे. रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया सारख्या कंपन्या सीओएआयच्या सदस्य आहेत.

महत्त्वाचे म्हणजे लोक सोशल मीडियावर असे ऑडिओ आणि व्हिडीओ मेसेज शेअर करत आहेत ज्यात देशातील कोविड-१९ च्या वाढत्या परिस्थितीसाठी ५ जी टॉवर्सना दोषी ठरविण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून एक मेसेज सोशल मीडिया आणि व्हॉट्सअ‍ॅपवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, त्यामध्ये असा दावा केला जात आहे की, ५ जी तंत्रज्ञानामुळे कोरोना साथीचा रोग पसरत आहे. परंतु या व्हायरल मेसेजमध्ये काहीच सत्य नाही आणि पीआयबी फॅक्ट चेकच्या टीमने याबाबत पुष्टी केली.

हे ही वाचा:

एअर इंडियावर सायबर हल्ला, प्रवाशांचा डेटा धोक्यात?

ॲड. प्रदिप गावडेंवर ठाकरे सरकारची ‘तत्पर’ कारवाई

सरकार बरखास्त करा आणि राष्ट्रपती राजवट लागू करा

ठाकरे सरकार कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करतंय?

५ जी आणि कोरोनाचा काहीच संबंध नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. देशात अजून ५ जीची टेस्टिंगही सुरू झालेली नाही. केवळ जनतेला संभ्रमित करण्यासाठी सोशल मीडियावरून अशा प्रकारच्या अफवा पसरविल्या जात आहेत. अशा अफवांना काहीही वैज्ञानिक आधार नसल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानेहे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे अशा अफवा पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा