26 C
Mumbai
Tuesday, December 9, 2025
घरविशेषपाकवर वचक ठेवायला भारत- पाकिस्तान सीमेलगत नवा एअरबेस

पाकवर वचक ठेवायला भारत- पाकिस्तान सीमेलगत नवा एअरबेस

पंतप्रधान मोदी यांनी गुजरातमधील डीसा येथे नवीन एअरबेस बांधण्याची घोषणा केली आहे.

Google News Follow

Related

पाकिस्तानकडून भारत पाक सीमेवर कुरापती सुरूच आहेत. पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारत पाकिस्तान सीमेलगत नवीन एअरबेस म्हणजे हवाई तळ उभारण्यात येणार आहे. गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील डीसा येथे नवा एअरबेस उभारण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी यांनी गुजरातमधील डीसा येथे नवीन एअरबेस बांधण्याची घोषणा केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी, १९ ऑक्टोबर रोजी गुजरातमधील गांधीनगर येथे डिफेन्स एक्सपो २०२२ चे उद्घाटन केले आहे. यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत पाकिस्तान सीमेजवळील डीसा येथे नवीन लष्करी हवाई तळाची पायाभरणीही केली आहे. येत्या दोन वर्षात हे एअरफोर्स स्टेशन पूर्णपणे तयार होणार आहेत.

भारत पाकिस्तान सीमेजवळील नवी लष्करी हवाई तळाची पायाभरणी करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशाच्या सुरक्षिततेचे एक प्रभावी केंद्र म्हणून उदयास येणार आहे. केवळ एक मजबूत देशच जागतिक स्तरावर आपची मजबूत छाप पाडू शकतो. यासाठी आपली व्यावसायिक क्षमता वाढवण्याबरोबरच उच्च दर्जाची उपकरणं आणि तंत्रज्ञानावर भर देणे गरजेचे आहे. वेळोवेळी देशाच्या लष्कराने आपली उपस्थिती दाखवत उपयुक्तता सिद्ध केली आहे.

डीसा एअरबेस खास असणार आहे कारण

  • दक्षिण पश्चिमी एअर कमांडसाठी मोक्याचे स्थान असणार आहे.
  • महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानच्या सुरक्षेसाठी हे महत्त्वाचं स्थान आहे.
  • एअरबेस बांधण्यासाठी सुमारे एक हजार कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे.
  • हवाई दलाच्या ऑपरेशनल रेंजमध्ये विस्तार करण्यात येणार आहे.
  • भारत-पाकिस्तान सीमेपासून फक्त १३० किमी अंतरावर हे एअरबेस असणार आहे.
  • एअरबेससाठी सुमारे ४ हजार ५०० एकर जमीन निश्चित करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

पनवेल येथून पीएफआयच्या पदाधिकाऱ्यासह तिघांना अटक

भारताविरोधी वक्तव्य करणाऱ्या ब्रिटनच्या गृहमंत्र्यांचा राजीनामा

समीर वानखेडेंनी केलेल्या तक्रारीची राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडून दखल

रितेश, जीनिलीयाच्या कंपनीवर मेहेर नजर का?

संरक्षण क्षेत्रात मेक इन इंडिया ही आज एक यशोगाथा बनत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. गेल्या पाच वर्षांत आपली संरक्षण निर्यात आठ पटीने वाढली आहे. २०२१-२०२२ मध्ये भारताची संरक्षण निर्यात सुमारे १३ हजार कोटी रुपयांची आहे. तसेच आगामी काळात हीच निर्यात ४० हजार कोटी रुपयापर्यंत पोहोचवण्याचे लक्ष्य ठेवणार असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. दरम्यान, गुजरातच्या भूजमध्ये आधीच एक एअरबेस आहे. आता डीसा येथे नवा एअरबेस उभारण्यात येईल.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा