नांदेड येथील शासकीय रुग्णालयातील एका रुग्णाच्या पायाला चक्क उंदराने कुरतडल्याच्या प्रकरणी आरोग्य खात्याच्या संचालकांकडून संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली आहेत.
संपूर्ण चौकशी करून अहवाल आल्यानंतर संबंधिताविरुद्ध कारवाई करण्यात येईल असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता
नांदेड मधील श्री गुरु गोबिंदसिंघजी शासकीय रुग्णालयात हा प्रकार घडला. 63 वर्षीय रमेश यन्नावार यांना मधुमेह आहे. त्यांच्या पायावरील एका शस्त्रक्रियेसाठी ते रुग्णालयात भरती झाले होते. पहाटे साडेतीन चार दरम्यान त्यांच्या पायाला उंदीर कुरतडत होता. त्यांना अचानक जाग आल्याने उंदीर पळाला.
त्यांनतरही तो उंदीर शस्त्रक्रिया विभागात फिरत होता. रुग्णाच्या नातेवाईकाने उंदीर फिरत असल्याचा व्हिडीओ मोबाईलमध्ये चित्रित केला. शासकीय रुग्णालयाचा हा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आल्यावर नांदेड दक्षिणचे शिवसेनेचे आमदार आनंद बोनढारकर रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली. प्रशासनाला धारेवर धरलं .







