29 C
Mumbai
Friday, December 5, 2025
घरविशेषमंत्रालयातील आत्महत्येचे प्रयत्न रोखण्यासाठी गृहविभागाची नवी नियमावली

मंत्रालयातील आत्महत्येचे प्रयत्न रोखण्यासाठी गृहविभागाची नवी नियमावली

मंत्रालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आता प्रवेश पास बंधनकारक

Google News Follow

Related

मंत्रालयात वारंवार होणारे आत्महत्येचे प्रयत्न आणि सुरक्षा जाळीवर केल्या जाणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती गृह विभागाकडून नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यामधील धरणग्रस्त नागरिकांनी मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उड्या मारून आंदोलन केले होते. या घटनेमुळे पोलिसांची तारांबळ उडाली होती आणि सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला होता. ही घटना ताजी असताना काल एका कंत्राटी शिक्षकाने मंत्रालयातील सुरक्षा जाळीवरती उतरून आंदोलनाचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार आता मंत्रालयात येणाऱ्या सर्व व्यक्तींना प्रवेश पास हा बंधनकारक असणार आहे. तर येत्या काही दिवसांत ऑनलाईन पासेस देण्याची सुविधा सुरू करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

मंत्रालयामध्ये दर दिवशी ५,००० पेक्षा जास्त नागरिक आपल्या कामासाठी येतात शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे मंत्रालयात यापुढे किती व्यक्तींना प्रवेश देण्यात यावा याबाबत पोलीस उपायुक्त मंत्रालय सुरक्षा यांना सूचना देण्यात आल्या आहेत. एका महिन्याच्या आत त्यांच्याकडे याबाबतचा अहवाल मागवण्यात आला आहे.

हे ही वाचा:

रायफल स्पर्धेत सिफ्ट कौर सामराची सुवर्ण, आशी चौक्सीची कांस्य पदकाला गवसणी

एनआयएकडून खलिस्तानी- गँगस्टर्स विरोधात कारवाईचा बडगा

नाझी सैनिकाचा गौरव; कॅनडाच्या लोकसभा अध्यक्षाचा राजीनामा

इराकमध्ये लग्नसोहळ्यात लागलेल्या आगीत १०० ठार

काय आहेत नवीन सूचना?

  • मंत्रालयात येणाऱ्या विजिटर साठी गार्डन गेट येथे अद्यावत सुरक्षा तपासणी कक्ष केले जाणार आहे.
  • मंत्रालयात यापुढे मंत्री आणि सचिव यांच्या गाड्यांना प्रवेश राहील. तर खाजगी गाड्यांसाठी योग्य ती परवानगी घेऊनच प्रवेश दिला जाणार.
  • मंत्रालयामध्ये प्रवेश करणाऱ्या व्यक्तींना RFID स्वरुपाचे प्रवेशपत्र देण्याची कार्यवाही सुरू आहे.
  • जो पर्यंत RFID स्वरुपाचे प्रवेश पत्रिका देण्याची कार्यवाही देण्याची कार्यवाही सुरू होत नाही, तोपर्यंत मंत्रालयामध्ये प्रत्येक मजल्यासाठी कलर कोड पत्रिका देण्याची व्यवस्था मंत्रालय सुरक्षा विभागामार्फत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
  • अभ्यागतांना कायालयीन वेळेनंतर मंत्रालयामध्ये थांबू न देण्याच्या सूचना.
  • मंत्रालयात बाहेरील खाद्यपदार्थ आणण्यास मनाई करण्यात आली आहे. यामध्ये जेवणाचे डबे हे वगळण्यात आले आहेत.
  • मंत्रालय अंतर्गत आणि बाह्य परिसराची सीसीटीव्ही मार्फत सतत निगराणी ठेण्यात येईल. संरक्षक जाळी ओलांडून प्रवेशाचा प्रयत्न होत असल्यास त्याबाबत अलर्ट संदेश देणारी कार्य प्रणाली पोलीस उपायुक्त, मंत्रालय सुरक्षा यांनी एक महिन्यात कार्यन्वित करण्याच्या सूचना.
  • मेट्रो सब वे येथे सुरक्षा तपासणी कक्ष उभारण्याबाबत सूचना.
  • सर्व प्रकारच्या कंत्राटी कामगारांची सीसीटीएनएस यंत्रणेद्वारे तपासणी.
  • मंत्रालयाच्या टेरेसवर जाण्याचे सर्व मार्ग बंद करण्याबाबत सूचना.
  • तसेच मंत्रालयाच्या मोकळ्या कॉरिडॉरमध्ये खिडक्यांमधून किंवा प्रत्येक मजल्यावरील मोकळ्या जागांमधून उडी मारण्याचा प्रयत्न अभ्यागतांमार्ग होउ शकतो. अशा ठिकाणी Invisible Steel Ropes लावण्याची कार्यवाही सार्वजनिक बांधकाम विभागाने एक महिन्यात करण्याच्या सूचना.
  • मंत्रालय परिसरात पाळीव प्राण्यांना प्रतिबंध करण्यात आला आहे.
  • मंत्रालयामध्ये प्रवेश करण्याऱ्या अभ्यागतांनी त्यांच्यासोबत दहा हजारपेक्षा अधिक रक्कम घेऊन मंत्रालयात प्रवेश करण्यास मनाई करण्यात येत आहे.
  • वारंवार मंत्रालयात प्रवेश करण्याची कारणमिमांसा यादी तयार करण्याच्या सूचना.
  • मंत्रालयामध्ये आप्तकालिन परिस्थिती हाताळण्यासाठी अग्निशमन वाहन तातडीने प्रवेश करू शकेल अशी व्यवस्था मंत्रालय सुरक्षा कक्षाने कार्यान्वित करावी.
  • मंत्रालय सुरक्षेसाठी कार्यान्वित असलेली Drone यंत्रणा सुस्थितीत ठेण्याबाबत सूचनाही गृह विभागाने दिल्या आहेत
  • लोकप्रतिनिधी यांच्या सोबत येणाऱ्या नागरिकांनाही पास काढावा लागणार.
  • ज्या विभागात काम आहे त्याच विभागात जाता येणार अन्यथा कारवाई केली जाणार.तसेच कार्यालयीन कामकाजाची वेळ संपल्यानंतर मंत्रालयात थांबता येणार नाही.
National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा