24 C
Mumbai
Saturday, December 20, 2025
घरविशेषबदलापूरचे रहिवासी का वैतागले एसी रेल्वेवर

बदलापूरचे रहिवासी का वैतागले एसी रेल्वेवर

ऐन गर्दीच्या वेळेत धावणाऱ्या साध्या लोकल फेऱ्या बंद करून, वातानुकूलित लोकल गाड्या चालू केल्यामुळे प्रवांशानी संताप व्यक्त करत आंदोलन केले.

Google News Follow

Related

मुंबईची ‘लाईफलाईन’ म्हणून ओळखली जाणारी लोकल रेल्वेच्या साध्या फेरीमध्ये एसी म्हणजेच वातानुकूलित लोकलचा समावेश करण्यात आला आहे. कार्यालयीन वेळात वाढलेल्या वातानुकूलित लोकलच्या फेऱ्या कमी करून, साध्या लोकलच्या फेऱ्या चालू कराव्यात या संदर्भात दोन दिवसापूर्वी कळवा स्थानकात प्रवाशांमार्फत आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनापाठोपाठ सोमवारी बदलापूर रेल्वे स्थानकांत याच मुद्द्याच्या आधारे प्रवाशांनी रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाच्या बाहेर उस्फुर्तपणे आंदोलन केले. या घटनेचा पडसाद विधानसभेतही उमटले व विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सायंकाळी छत्रपती रेल्वे स्थानकातून सुटणारी ५ वाजून २२ मिनिटांची लोकल वातानुकूलित केल्यामुळे त्यानंतर सुटणाऱ्या खोपोली गाडीवरील ताण वाढला आहे. याच कारणामुळे संताप वाढत जावून प्रवाशांनी बदलापूर रेल्वेस्थानकात उतरून, स्थानक व्यवस्थापकांच्या कार्यालयाकडे धाव घेतली. तिथे प्रवाशांनी “वातानुकूलित रेल्वे बंद करा” अशा घोषणा दिल्या. व्यवस्थापकांनी प्रवाशांच्या मागणीची दखल घेत. ही मागणी वरिष्ठांना कळवण्याचे आश्वासन दिल्यानंतर प्रवासी मार्गस्थ झाले.

हे ही वाचा:

विधानभवनाजवळ शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

भाजपा नेत्या सोनाली फोगाट यांचे ४१ व्या वर्षी निधन

जागतिक वडापाव दिन: मुंबईची ओळख असणाऱ्या वडापावचा जन्म कसा झाला झाला?

डान्सर सपना चौधरीला होणार अटक?

ऐन गर्दीच्या वेळेत धावणाऱ्या साध्या लोकल फेऱ्या बंद करून, वातानुकूलित लोकल गाड्या १९ ऑगस्ट पासून चालू करण्यात आल्या होते. त्यामुळे लोकल वरील प्रवासी ताण वाढून, परिणामी लोकलच्या आत शिरणे मुश्किल झाले असून प्रवास भयंकर त्रासदायक व वेदनारहित ठरत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. साध्या लोकल फेऱ्यांचे वेळापत्रक बदलून वातानुकूलित लोकल चालू केल्यामुळे प्रवाशांचा आक्षेप होता. याच आक्षेपांच रूपांतर संतापात झाल्यामुळे प्रवाशांनी ठाण्यापुढील कळवा व बदलापूर स्थानकात उतरून आंदोलन केले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा