31 C
Mumbai
Tuesday, March 17, 2026
घरविशेषरंगकर्मीं का रागावले आहेत? जाणून घ्या कारणे...

रंगकर्मीं का रागावले आहेत? जाणून घ्या कारणे…

Google News Follow

Related

कोविड लॉकडाऊनमुळे गेले दीड वर्ष विविध क्षेत्रातील रंगकर्मींना हाल सोसावे लागत आहेत. त्यामुळे या रंगकर्मींमध्ये ठाकरे सरकारबद्दल प्रचंड रोष आहे. आपल्याकडे सरकारने या अडचणीच्या काळात पाठ फिरवल्याचे दुःख रंगकर्मीना आहे.

या लॉकडाऊनच्या काळात अनेक कलाकारांवर आणि रंगभूमीवर काम करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. काहींवर तर आत्महत्या करण्याचीही वेळ आली आहे. या क्षेत्रातील ८० टक्के कर्मचारी हे रोजंदारीवर जगतात. अशावेळी या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांकडे राज्य सरकारने पूर्णपणे पाठ फिरवली आहे. रंगकर्मींच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे रंगकर्मींमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे.

नाटक, सिनेमा मालिका यांच्याबरोबरच, भजन, किर्तन, भारुड, गोंधळ तसंच तमाशासारख्या लोककलांना हे कलाकार जिवंत ठेवत असतात. आज लॉकडाऊनमुळे प्रेक्षकांना हे सगळे कलाविष्कार बघता येत नाहीयेत. परंतु या कलाकारांवर मोठंच संकट कोसळलं आहे. प्रेक्षक नसल्याने कलाकारांचं उपजीविकेचं साधनच नष्ट झालं आहे. अनेक रंगकर्मी रोजंदारीवर काम करतात. त्यामुळे आज अनेक कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा स्थितीत कलाकारांनी काही मागण्या सरकारकडे ठेवल्या आहेत. राज्यभरातील तमाम रंगकर्मी या मागण्यांसाठी आंदोलन करणार आहेत.

हे ही वाचा:

सरकारच्या आदेशानेच फोन टॅपिंग केलं

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी केलं शंभरीत पदार्पण

भारताला हरवत श्रीलंकेने साधली टी-२० मालिकेत बरोबर

भारताचे ‘भूत’ काढणार ‘साहेबांचा’ धूर

  • नंदीबैल, वासुदेव, पोतराज यांच्यासारख्या लोक कलाकारांना सोसायट्यांमध्ये कला सादर करण्याची जवाबदारी द्यावी. तसंच त्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा द्यावी.
  • ज्या रंगकर्मींच्या मुलांना फी भरता न आल्यामुळे शाळेतून काढून टाकण्यात आलं आहे, त्यांना पुन्हा रुजू करावे.
  • दीड वर्षात काम करता न आल्यामुळे, वीजबील आणि घरभाड्यात सवलत देण्यात यावी.
  • सर्व अटी, नियम पाळून, कलाकारांना काम करण्याची मुभा देण्यात यावी.
  • शूटिंग करणाऱ्या कलाकारांना लोकलने प्रवासाची मुभा द्यावी.
  • रंगकर्मींना दरमहा ५ हजार रुपये इतका उदरनिर्वाह भत्ता द्यावा.
  • या सर्व मागण्या रंगकर्मी आणि कलाकारांनी केला आहेत.

सिनेनाट्यअभिनेते विजय पाटकर, विजय राणे, मेधा धाडगे, संचित यादव. शीतल माने यांनी या मागण्या सर्व रंगकर्मीच्या वतीने सरकारकडे केल्या आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
298,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा