आदित्य ठाकरे यांची टीका नेहमीप्रमाणे बालिश…

भाजपा आमदार अतुल भातखळकरांकडून प्रत्युत्तर 

आदित्य ठाकरे यांची टीका नेहमीप्रमाणे बालिश…

मान्सून पावसामुळे मुंबईत साचलेल्या पाण्यावरून टीका करणाऱ्या आदित्य ठाकरेंना भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. आमदार आदित्य ठाकरे यांचे ट्वीट बालिश पणाचे असल्याचे आमदार भातखळकरांनी म्हटले आहे. ते म्हणाले, हिंदमाता परिसरामध्ये वर्षानुवर्षे पाणी साचते. हे २५ वर्षे आपल्या सत्तेमध्ये ब्रिमस्टोवॅड प्रोजेक्ट हे पूर्ण करू शकले नाहीत. एसटीपी प्लांट त्या ठिकाणी लावू शकले नाहीत. ही सर्व कामे राज्य सरकारच्या माध्यमातून होत आहेत.

रस्त्यांच्या सीसीकरणासारख्या अन्य पाण्याचा निचरा होण्यासाठीच्या उपाय योजना राज्य सरकार सध्य परिस्थितीमध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून करत आहेत. त्यामुळे असे बालिश ट्वीट केल्याने आणि खोटी माहिती सांगितल्याने मुंबई जनता यांना भूलेल अशा गैरसमजात त्यांनी काही राहायचे काम नाहीये. मुंबईमध्ये पाऊस आज अचानक पडला, समुद्राला भरती आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही ब्रिमस्टोवॅड प्रोजेक्ट पूर्ण करू आणि मुंबईला गतीने पुढे नेण्याचे आम्ही करू, असे अतुल भातखळकर म्हणाले.

ते पुढे म्हणाले, अशा गोष्टींवरून देखील आदित्य ठाकरेंचे राजकारण करणे हा बालिशपणा आहे. हिंदमाता परिसरात अधिकचे पाईन लावून, जेव्हा समुद्राला भरती असते आणि त्याच वेळी पाऊस पडत असतो. अशा वेळेला आपण जे पाणी समुद्रात सोडतो तेव्हा ते मागे वळते (बॅक मारते).

त्यामुळे ब्रिमस्टोवॅड प्रोजेक्टच्या माध्यमातून अधिक ताकतीने पाणी उचलून समुद्रामध्ये खोलवर नेये, याच बरोबर अशा अनेक प्रकारच्या योजनांवर काम चालू आहे. मला असे वाटते कि येत्या वर्षा-दीड वर्षामध्ये मुंबई शहरातील सखल भागात पाणी भरण्याचे प्रमाण बंद होईल, हा मला पूर्ण विश्वास आहे आणि त्या दिशेने गेल्या अडीच वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर काम केले आहे, असे अतुल भातखळकर म्हणाले.

हे ही वाचा : 

पावसात वाढतो वात आणि पित्त

जगापेक्षा पाकिस्तानात जास्त दहशतवादी!

भारतापासून पाकिस्तानला वाचवल्याबद्दल शेहबाज शरीफ यांनी एर्दोगान यांचे मानले आभार!

मुंबईत मुसळधार पाऊस, रस्ते पाण्याखाली, विमान आणि लोकल गाड्यांवर परिणाम!

दरम्यान, आदित्य ठाकरेंनी ट्वीटकरत म्हटले, गेल्या ३ वर्षांपासून बीएमसीवर नियंत्रण ठेवणाऱ्या भाजप सरकारच्या पूर्ण उदासीनतेमुळे आज मुंबई ठप्प झाली. मुंबईमध्ये अशा ठिकाणी पाणी साचले आहे जिथे पूर्वी कधीही पाणी साचले नव्हते.

२०२१/२२ मध्ये आपण ज्या हिंद माताला पाणी साचण्यापासून मुक्त केले होते, ती आज पुन्हा पाणी साचले आहे कारण @mybmc ने वेळेवर पाणी उपसण्याची प्रक्रिया सुरू केली नाही. गेल्या आठवड्यात अंधेरी सबवे आणि साकी नाका होता. आज, असे अनेक भाग आहेत जिथे भाजपचा कारभार आपण पाहत आहोत. भाजप मुंबईचा एवढा तिरस्कार का करते?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.

Exit mobile version