आयुर्वेदानुसार पावसाळा हा आरोग्यासाठी एक आव्हानात्मक ऋतू मानला जातो. या ऋतूमध्ये वातावरणात गारवा वाढतो, आणि लोक या हंगामाचा आनंद घेण्यासाठी तेलकट व तळलेले पदार्थ अधिक खाण्याकडे वळतात. परिणामी, शरीराची पचनशक्ती – म्हणजेच ‘अग्नि’ – कमकुवत होते. याच वेळी वातावरणातील आर्द्रतेमुळे वात दोष वाढतो, ज्यामुळे अंगदुखी, सुकल्याची भावना व बेचैनी निर्माण होऊ शकते. तसेच पित्त दोष सुद्धा संचित होतो, जो शरीरातील उष्णता व पचनक्रियेशी संबंधित आहे. यामुळे शरीरात जळजळ, उष्णता व पोटाचे त्रास उद्भवू शकतात. या ऋतूमध्ये योग्य आहार, दिनचर्या व सतर्कता फार महत्त्वाची ठरते, कारण तीच शरीरास आरोग्यदायी व संतुलित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरते.
पचनशक्ती कमी होणं आणि वात-पित्त दोष वाढल्यामुळे पावसाळ्यात शरीर कमजोर होतं आणि दोषांची असंतुलित स्थिती उद्भवते. त्यामुळे संसर्गाचा धोका आणि पचनाशी संबंधित समस्याही जास्त प्रमाणात आढळतात. म्हणूनच आयुर्वेदातील ऋतुचर्या संकल्पनेमध्ये हंगामानुसार आहारावर भर देण्यात आला आहे. ऋतू बदलतो तसे शरीरही बदलते. आयुर्वेद म्हणतो की जर आपण आपल्या जीवनशैलीला या ऋतू परिवर्तनानुसार ढाळलं, तर आपल्याला रोगांपासून संरक्षण मिळू शकतं आणि उत्तम आरोग्य टिकवून ठेवता येतं.
हेही वाचा..
जगापेक्षा पाकिस्तानात जास्त दहशतवादी!
भारतापासून पाकिस्तानला वाचवल्याबद्दल शेहबाज शरीफ यांनी एर्दोगान यांचे मानले आभार!
‘ऑपरेशन सिंदूरनंतर’ पंतप्रधान मोदींचा गुजरातमध्ये रोड शो
मुंबईत मुसळधार पाऊस, रस्ते पाण्याखाली, विमान आणि लोकल गाड्यांवर परिणाम!
ऋतुचर्यानुसार पावसाळ्यातील आहार अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण खाल्लेल्या अन्नाचा थेट परिणाम आपल्या पचनक्रियेवर होतो. या काळात हलका, गरम व पचायला सोपा आहार घ्यावा. थंड, जड व तेलकट अन्न टाळावं. अधिक तळलेले पदार्थ खाण्याचे टाळावे आणि शक्यतो ताजं व स्वच्छ अन्नच सेवन करावं. सुश्रुत व चरक संहितामध्ये ऋतूनुसार आचरण करण्याचा सल्ला दिला आहे. पावसाळ्यात आपल्या दिनचर्येमध्येही योग्य बदल करणे आवश्यक आहे जेणेकरून शरीर निरोगी राहील. दररोज योगासने किंवा हलका व्यायाम करावा, त्यामुळे वात दोष नियंत्रणात राहतो. ओले कपडे जास्त वेळ अंगावर ठेवू नयेत, त्यामुळे सर्दी-खोकल्याचा त्रास होऊ शकतो. शरीर कोरडं आणि उबदार ठेवावं. थंडी जाणवत असल्यास गरम पाण्याने स्नान करावं. पावसात जास्त वेळ न राहणं हितावह असतं, कारण त्यामुळे शरीर अधिक दुर्बल होऊ शकतं.
दररोज ७-८ तासांची पुरेशी झोप घेणं आवश्यक आहे आणि ताण-तणाव टाळावा, कारण तोही वात व पित्त दोष वाढवू शकतो. थंडी जाणवत असल्यास तिळ किंवा मोहरीच्या तेलाने शरीराला मसाज (अभ्यंग) करावा. आपल्या आजूबाजूचं वातावरण स्वच्छ ठेवणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे, जेणेकरून कीटक व रोगांचा प्रसार होणार नाही. फळं व भाजीपाल्याची नीट स्वच्छ धुऊनच वापर करावा. पाय नेहमी कोरडे आणि स्वच्छ ठेवावेत, कारण ओल्या पायांनी बुरशीजन्य (फंगल) संसर्ग होण्याचा धोका वाढतो. शक्य असल्यास कोमट किंवा गरम पाण्याने स्नान करावं, कारण थंड पाणी वापरल्याने वात दोष वाढू शकतो. स्नानाच्या पाण्यात नीम किंवा तुळशीची पाने घालावीत, त्यामुळे त्वचेला संसर्ग होणार नाही व जंतूंपासून संरक्षण मिळतं.
