24 C
Mumbai
Wednesday, December 24, 2025
घरविशेषतीन षटकारांच्या हॅटट्रिकनंतर धोनीने चाहत्याला दिली खास भेट

तीन षटकारांच्या हॅटट्रिकनंतर धोनीने चाहत्याला दिली खास भेट

Google News Follow

Related


मुंबई इंडियन्सविरुद्ध त्यांचा घरच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्जने आपल्या चौथ्या विजयाची नोंद केली. धोनी शेवटच्या षटकात फलंदाजीसाठी आला. त्याने या ओव्हरमध्ये ४ चेंडूत ३ गगनभेदी षटकार खेचत नाबाद २० धावा ठोकल्या. याच २० धावा चेन्नईसाठी निर्णायक ठरल्या. मुंबईला चेन्नईने २० धावाने पराभूत केले. माहीने मैदानात उतरताच षटकारांची हॅटट्रिक मारत चाहत्यांची मने जिंकली. धोनी एवढ्यावरच थांबला नाही, मैदानाबाहेरही त्याने चाहत्यांची मने जिंकली.

डाव संपायला अवघे चार चेंडू शिल्लक असताना धोनी विसाव्या षटकात फलंदाजीसाठी उतरला. २० वे षटक टाकत असलेल्या हार्दिक पंड्याला माहीने पहिल्या तीन चेंडूत ३ षटकार मारले आणि त्यानंतर शेवटच्या चेंडूवर २ धावा केल्या. अशा प्रकारे त्याने ४ चेंडूत नाबाद २० धावा केल्या. डाव संपल्यानंतर चेन्नईचा माजी कर्णधार ड्रेसिंग रूममध्ये परतत असताना त्याने एका चाहत्याला मोठी खास भेट दिली.

पॅव्हेलियन परतताना धोनीने पायऱ्यांवर बसलेल्या एका छोट्या मुलीला चेंडू भेट दिला. याच चेंडूवर चेन्नई सुपर किंग्जने डाव खेळला होता आणि धोनीने षटकारांची हॅटट्रिकही केली होती. धोनीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा :

ताब्यात घेतलेल्या जहाजावरील कर्मचाऱ्यांना भारतीय अधिकाऱ्यांना भेटण्याची परवानगी देणार

राजस्थान: ट्रकच्या धडकेने कारला आग, सात जणांचा होरपळून मृत्यू!

“पत्राचाळीचे आरोपीही पंतप्रधान मोदींना पत्र लिहायला लागले आहेत”

तीन षटकारांच्या हॅटट्रिकनंतर धोनीने चाहत्याला दिली खास भेट

मुंबईने गमवला चौथा सामना
वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत २०६ धावा केल्या. संघाकडून कर्णधार ऋतुराज गायकवाडने ४० चेंडूत ६९ धावांची खेळी खेळली. ज्यात ५ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईचा संघ २० षटकांत केवळ १८६ धावा करू शकला. त्यामुळे मुंबईला आयपीएल २०२४ मधील चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले. मुंबईने आतापर्यंत ६ सामने खेळले आहेत.

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा