भिवंडीत दुकानांमध्येही पाणी
मुसळधार पावसाचं पाणी दुकानात शिरल्याने भिवंडीत व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शहरातील अनेक भागांतील दुकानांत आणि घरात पावसाचं पाणी शिरलं आहे. पावसानंतर जिकडे बघावं तिकडे रस्त्यावर फक्त चिखल दिसत आहे. भिवंडी शहरात बुधवार रात्रीपासून पडलेल्या मुसळधार पावसाने तिनबत्ती, नजराणा कंपाऊंड बाजार पेठेतील शेकडो दुकानात पाणी शिरल्याने गुरुवारी सायंकाळी पाणी ओसरल्यानंतर व्यापाऱ्यांनी आज दुकाने उघडली. त्यानंतर दुकानदार व्यापारी यांचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
यामध्ये दुकानातील भाजीपाला, लहान मुलांचे खाऊ, धान्य, मोबाईल, चपला, बूट, हॉटेल, टेलर, कपडा, इलेक्ट्रिक वस्तू, हार्डवेअर ,कॉस्मेटिक दुकानांसह अनेक भाजीपाला विक्री करणाऱ्यांचा माल साचलेल्या पाण्यामुळे खराब झाला. वस्तू, साहित्य, धान्य, खाऊ मातीमोल झाल्याचे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झालंय. मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे व्यापाऱ्यांना भाजीपाला, धान्य, मुलांचा खाऊ, भाजीपाला कचऱ्यात फेकावा लागला तर मोबाईल, इलेक्ट्रिक साहित्य, कपडा, हॉटेल, मिठाई, कॉस्मेटिकसह अनेक वस्तू, साहित्य भिजल्याने व्यापाऱ्यांचं नुकसान होऊन ते मेटाकुटीला आले आहेत.
हे ही वाचा:
रायगडमध्ये दरड कोसळून ३६ जणांचा मृत्यू
सांगली, कोल्हापूरमध्ये २०१९ची पुनरावृत्ती होणार?
राज्याला ड्रायव्हर नको तर लोकांचं हित पाहणारा मुख्यमंत्री हवा
संरक्षण क्षेत्रात मोदी सरकारकडून ‘ही’ नवी सुधारणा
शिवाजीनगर गोवंडी भागात एक वन प्लस ग्राऊंड घर कोसळलं. पहाटे पाच वाजताची घटना आहे. या घटनेमध्ये ११ लोक जखमी झाले आहेत तर चार लोकांचं दुर्दैवी निधन झालं आहे. फायर ब्रिगेड आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. यामध्ये जे लोक अडकले होते त्यांचं सुरक्षितपणे रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे. काही लोकांची चिंताजनक परिस्थिती आहे. राजावाडी आणि सायन हॉस्पिटलमध्ये जखमींना उपचारासाठी ऍडमिट करण्यात आलेला आहे. घटनास्थळी समाजवादी पार्टीचे आमदार अबू असीम आझमी यांनी भेट दिली.







