25 C
Mumbai
Saturday, January 31, 2026
घरविशेषदादरमध्ये 'शिवाजी महाराजां'नी काढला 'अफझल खाना'चा कोथळा

दादरमध्ये ‘शिवाजी महाराजां’नी काढला ‘अफझल खाना’चा कोथळा

Google News Follow

Related

दहीहंडी उत्सवाची धूम सर्वत्र जाणवत होती. शुक्रवारी मुंबई, ठाणे येथे विविध ठिकाणी दहीहंडीचा माहोल पाहायला मिळाला. अशा वातावरणात दादरमध्ये अचानक अफझल खान अवतरला.

आश्चर्य वाटणे स्वाभाविक होते. शिवजंयती नसतानाही अफझल खानाचा वध हे नाट्य चक्क दहीहंडीत दिसले. पण त्याचे वैशिष्ट्य म्हणजे हे नाट्य कोणत्याही मंचावर झाले नाही तर चक्क गोविंदांनी आपल्या हातांनी एक मोठा लाकडी तुकडा हातात धरला होता. हे सगळे गोविंदा दुसऱ्या थरात होते. त्यांनी सगळ्यांनी मिळून हा लाकडी तुकडा हातात धरला होता. त्यावर मग अफझल खान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा वेश करत दोन अभिनेते उभे राहिले. मग अफझल खानाच्या वधाचा प्रसंग तिथे उभा राहिला.

अफझल खान शिवाजी महाराजांची भेट तिथे दाखविण्यात आली. अफझल खानाने शिवाजी महाराजांना मिठी मारली आणि पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला. थोड्याचवेळात शिवाजी महाराजांनी वाघनखांनी अफझल खानाचे पोट फाडले आणि त्याला खाली पाडले. हे नाट्य पूर्ण झाल्यावर त्याला उपस्थित जनसमुदायाचा प्रचंड प्रतिसाद लाभला.

हे ही वाचा:

तुमच्या आशीर्वादाने फोडू महापालिकेतील भ्रष्टाचाराची हंडी

मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराची हंडी फोडणार; मलई गरिबांना वाटणार

बालसुधारगृहात १६ वर्षांच्या मुलाची हत्या केली त्याच्यापेक्षा लहान मुलांनी

भाविकांच्या दानधर्मातून श्रीकृष्णासाठी २५ लाखांचा पाळणा

 

महाराष्ट्रात हिंदुत्ववादी सरकार असल्याचा हा परिणाम असल्याचीही चर्चा होती. महाविकास आघाडीचे सरकार असताना मुस्लिमांचे लांगुलचालन होत असल्याचा मुद्दा वारंवार चर्चेत आला होता. त्यावरून विरोधी पक्षातील भाजपाने सातत्याने सरकारला धारेवर धरले होते. औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण, टिपू सुलतान जयंती, उस्मानाबादचे धाराशीव,  असा नामबदल, औरंगजेबाच्या थडग्यावर चादर चढविण्याचे कृत्य यावरून महाविकास आघाडी सरकार उघडे पडले होते. पण आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर मात्र पुन्हा एकदा हिंदुत्ववादाला अच्छे दिन आलेत अशी लोकभावना आहे. त्याचेच प्रतिबिंब दहीहंडीत करण्यात आलेल्या या अफझल खान वधाच्या प्रयोगात दिसले असे लोकांचे म्हणणे आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
289,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा