आग्रा येथील धर्मांतर प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या प्रकरणातील एका पीडित युवतीने पोलिस चौकशीत धर्मांतर टोळीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. पोलिसांनी या युवतीचा जबाब कोर्टातही नोंदवला आहे. ही युवती मूळची देहरादूनची असून, आग्रा पोलिसांनी तिला वाचवले आहे. पोलिस चौकशीत युवतीने सांगितले की, सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘अब्बू तालिब’ नावाच्या एका व्यक्तीशी तिचा संपर्क झाला. त्याने तिचा विश्वास जिंकून प्रेमसंबंध निर्माण केला आणि नंतर त्याने तिला आपल्या “फॅमिली”शीही भेट घालून दिली. यानंतर तालिबने तिला ‘आयशा’ नावाच्या एका महिलेची ओळख करून दिली, जिने तिला ‘अब्दुल रहमान’ नावाच्या व्यक्तीशी भेटवलं.
आग्रा पोलिसांच्या माहितीनुसार, अब्बू तालिब उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरचा रहिवासी आहे, तर आयशा आणि अब्दुल रहमान हे दोघंही देहरादूनचे आहेत. युवतीने सांगितले की, आयशा तिच्यावर “सेफ हाऊस”मध्ये राहण्याचं आणि आलिशान जीवनशैलीचं आमिष दाखवत होती. मात्र त्यासाठी तिला “इन्व्हेस्टमेंट” करावी लागेल असं सांगण्यात आलं — म्हणजेच, तिला कोणाच्या दुसऱ्या, तिसऱ्या किंवा चौथ्या पत्नीचं स्थान स्वीकारावं लागेल.
हेही वाचा..
तैवानच्या सीमेवर चीनची लष्करी विमानं!
कंबोडियाच्या भारतीय दूतावासाने काय दिलाय सल्ला ?
भूस्खलन आणि पुरामुळे केदारनाथ यात्रा थांबली!
काँग्रेस देशाचाच विरोध करू लागलीय
आरोप आहे की, आयशा आणि अब्दुल रहमान यांनी तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकला. धर्म बदलल्यानंतर तिला नावांची यादी दिली गेली आणि त्यातून ‘मरियम’ हे नाव निवडायला लावलं. काही दिवसांपूर्वी तिचा फोन खराब झाल्यानंतर अब्बू तालिबने तिला नवीन फोन आणून दिला, ज्याचे पैसे आयशाने दिले. अब्बू तालिबच तिचा मोबाइल रिचार्ज करायचा. टोळीतील आयशा ट्रॅक होण्यापासून बचाव करण्यासाठी सेकंड हँड किंवा कीपॅड फोनचाच वापर करत होती.
आरोप आहे की, पैशाचे आमिष दाखवत अब्बू तालिब, अब्दुल रहमान आणि आयशाने तिला दबावत ठेवलं आणि व्हॉट्सॲपवरून कलमा पाठ करून घेतलं. तिचं नावही बदलून ‘मरियम’ ठेवण्यात आलं. युवतीने आणखी एक महत्त्वाचा खुलासा करत सांगितलं की, टोळीत झारखंडमधील ‘अयान’ नावाचा एक व्यक्तीही सामील आहे. अयानने तिला देहरादूनच्या एका मुलाची माहिती दिली, ज्याने तिला दिल्लीत नेले. तिथून तिला दुसरीकडे पाठवले जात होते, पण त्याआधीच आग्रा पोलिसांनी संपूर्ण टोळीचा पर्दाफाश करून तिचा रेस्क्यू केला. आतापर्यंत या प्रकरणात आग्रा पोलिसांनी १४ जणांना अटक केली आहे.







