27 C
Mumbai
Friday, January 23, 2026
घरविशेषकोरोना रुग्णांसाठी अजय देवगणकडून १ कोटींची मदत

कोरोना रुग्णांसाठी अजय देवगणकडून १ कोटींची मदत

Google News Follow

Related

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे थैमान पाहायला मिळत आहे. वाढती रुग्णसंख्या, कोलमडलेली आरोग्य यंत्रणा, सोयी-सुविधा, औषधोपचार यासर्व गोष्टींवर ताण आला आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व स्तरावरुन मदतीचे हात पुढे येत असताना बॉलिवूडकरांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. बॉलिवूड अभिनेता अजय देवगणसह अनेक बॉलिवूडकरांनी पुन्हा एकदा कोरोनाबाधितांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत अनेक ठिकाणी कोव्हिड सेंटर उभारले जात आहे. मुंबईतील दादर परिसरात कोरोनाबाधितांवर उपचार व्हावा यासाठी छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरातील मुंबई महानगरपालिकेने कोविड एचडीयू रुग्णालय उभारले आहे. शिवाजी पार्कमधील स्‍काऊट-गाईड हॉलमध्‍ये २० रुग्‍णशय्या क्षमतेचे हे रुग्णालय आहे. हे रुग्णालय उभारण्यासाठी अजय देवगण मदत करत आहे.

या रुग्णालयात व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन सपोर्ट आणि इतर सुविधांचा समावेश असणार आहे. या कोव्हिड सेंटरसाठी अजय देवगण त्याची एनवाय फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आर्थिक मदत करणार आहेत. नुकतंच एनवाय फाऊंडेशनने सामाजिक उत्‍तरदाय‍ित्‍व म्‍हणून १ कोटी रुपयांची देणगी महानगरपालिकेकडे सुपूर्द केली आहे.

हे ही वाचा:

सुनील मानेच्या शिवसेना कनेक्शनची चौकशी करा

आता अमेरिकेकडून ७.४१ अब्ज रुपयांची मदत

लसीकरणासाठी दोन किलोमीटरपर्यंत रांगा

सुनील मानेकडे प्रियदर्शनी पार्क ते अँटेलियाचे नकाशे

इतकचं नव्हे तर गेल्यावर्षी धारावीत उभारलेल्या कोव्हिड सेंटरसाठी अजय देवगण २०० बेडसाठी विनाशुल्क ऑक्सिजन सिलेंडर आणि दोन पोर्टेबल व्हेंटिलेटरची व्यवस्था करुन दिली होती. यामुळे आता हिंदुजा रुग्णालयातच दाखल होण्याची इच्छा असणाऱ्या रुग्णांना महापालिकेच्या या रुग्णालयात हिंदुजाच्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेता येणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा