द ओव्हल टेस्टच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा भारताचे दोन विकेट्स लवकर पडल्या, तेव्हा तिसऱ्या नंबरवर नाईट वॉचमन म्हणून आकाश दीप मैदानात उतरले. प्रेक्षक गोंधळले… समालोचक थक्क… इंग्लंडचे बॉलर हसले – “हा तर नाईट वॉचमन आहे, काही वेळ थांबेल आणि मग आउट होईल…”
पण दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळेस आकाश दीप तंबूत नाबाद परतला होता. पण तिसऱ्या दिवशी सकाळी मैदानावर जे घडलं, त्याने इंग्लंडच्या खेळाडूंना हम भी किसीसे कम नही म्हणत दिवसा-ढवळ्या आकाशने तारे दाखवून इंग्लंडला त्यांची जागा दाखवून दिली!
आकाश दीपने सुरुवातीपासूनच आत्मविश्वासाने बॅट फिरवायला सुरुवात केली. ७० चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण करत, १२ चौकारांची आतषबाजी केली आणि इंग्लंडच्या बॉलरना ‘डे झोन’मध्ये टाकलं. त्यांने ९४ चेंडूंमध्ये ६६ धावा करत आपल्या टेस्ट कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी साकारली – आणि तीही ‘चौकीदारी’ करत असताना!
रात्री आला होता, पण सकाळी इंग्लंडची लंका लावून गेला!”
आकाश आणि यशस्वी जायसवाल यांच्यात १०७ धावांची महत्वपूर्ण भागीदारी झाली. दोघांनी मिळून इंग्लंडवर तुटून पडत दे दणादण धावा वसूल केल्या. इंग्लंड कर्णधाराला फिल्डिंग कशी लावायची याचे विचार करायला भाग पाडले.
विशेष म्हणजे २०११ नंतर पहिल्यांदाच एखाद्या भारतीय नाईट वॉचमनने ५०+ धावा केल्या आहेत. त्याआधी हे ऐतिहासिक काम अमित मिश्रा यांने इंग्लंडविरुद्धच द ओव्हलवर केलं होतं.
फक्त बॅटिंगच नाही… बॉलिंगही दमदार!
याआधी लॉर्ड्स टेस्टमध्ये ग्रोइन इन्जरीमुळे संघाबाहेर झालेला आकाश दीप या सामन्यासाठी परतला आणि बॉलिंगमध्येही त्यांने जीव ओतला. त्याला केवळ १ विकेट मिळाली, तरी त्यांचा प्रयत्न शंभर टक्के होता.







