29 C
Mumbai
Tuesday, February 3, 2026
घरविशेषअनसूया सेनगुप्ताने रचला इतिहास, कान्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय!

अनसूया सेनगुप्ताने रचला इतिहास, कान्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय!

अन सर्टेन रिगार्ड सेगमेंटमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा मिळाला पहिला पुरस्कार

Google News Follow

Related

कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४ महोत्सव सोहळा अनेक दिवसांपासून फ्रान्समध्ये सुरु आहे.या सोहळ्यात अभिनेत्री अनसूया सेनगुप्ता हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.अन सरटेन रिगार्ड सेगमेंटमध्ये अभिनेत्री अनसूया सेनगुप्ता हिल हा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.विशेष म्हणजे अन सरटेन रिगार्ड सेगमेंटमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावणारी अनसूया सेनगुप्ता ही पहिली भारतीय आहे.बल्गेरियन चित्रपट निर्माते कॉन्स्टँटिन बोजानोव दिग्दर्शित ‘शेमलेस’ या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला हा पुरस्कार मिळाला आहे.

एका पोलिसांवर हल्ला केल्यानंतर दिल्लीतील वेश्यालयातून पळून जाणाऱ्या एका सेक्स वर्करचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.अनुसया ही मुंबईत प्रॉडक्शन डिझायनर म्हणून ओळखले जाते आणि सध्या ती गोव्यात राहते. ‘मसाबा मसाबा’ या नेटफ्लिक्स शोचा सेट डिझाइन करण्याचे काम तिने केले आहे.मूळची कोलकाता येथील असून तिने तिचे शिक्षण जाधवपूर विद्यापीठात घेतले. तिने बंगाली दिग्दर्शक अंजन दत्त यांच्या रॉक म्युझिकल मॅडली बंगाली (२००९) मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

हे ही वाचा:

पोर्शे अपघाताची माहिती वरिष्ठांना वेळेत न दिल्याने पुण्यातील दोन पोलिसांचे निलंबन!

‘नवीन पटनायक यांना व्हीके पांडियन यांनी ओलिस ठेवले आहे’

केरळमध्ये मान्सूनपूर्व पावसाचे थैमान; जनजीवन विस्कळीत

प. बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान टीएमसी नेत्याची हत्या

दरम्यान, चीनी चित्रपट निर्माते हू गुआन दिग्दर्शित ‘ब्लॅक डॉग’ या चित्रपटाला कान्स चित्रपट महोत्सवातील अन सर्टेन रिगार्ड सेगमेंटमधील पारितोषिक देण्यात आले, तर बोरिस लॉजकीन ​​यांच्या आश्रय-शोधक कथा ‘द स्टोरी ऑफ सॉलेमाने’ ला ज्युरी पारितोषिक मिळाले.

मराठमोळी अभिनेत्री छाया कदम यांना स्टँडिंग ओव्हेशन
कान्स फिल्म फेस्टिवल २०२४ मध्ये मराठी अभिनेत्री छाया कदम यांचीही जोरदार चर्चा झाली.विशेष म्हणजे छाया कदम यांचा अभिनय पाहून सोहळ्यात असणाऱ्या सर्व उपस्थित लोकांनी त्यांना स्टँडिंग ओव्हेशन दिल.फेस्टिवलमध्ये अभिनेत्रीच्या ‘ऑल वी इमेजिन ऍज लाईट’ या चित्रपटाचं स्क्रीनिंग पार पडलं.या चित्रपटात त्यांची प्रमुख भूमिका आहे.चित्रपटातील सर्व कलाकार यावेळी स्क्रीनिंग दरम्यान उपस्थित होते.चित्रपटाच्या स्क्रीनिंगनंतर त्यांच्यासाठी सर्वच उभे राहून टाळ्या वाजवू लागले.सध्या हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून सर्वत्र ठिकाणी याची चर्चा सुरु आहे.

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
290,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा