थायलंड-कंबोडियामध्ये अनेक वर्षांपासून सुरु असलेला सीमा संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे आणि या वादाचा केंद्रबिंदू ११व्या शतकातील तीन प्राचीन हिंदू मंदिरे ठरले आहेत. हा वाद इतका वाढला कि दोन्ही देशांनी एकमेकांच्या राजदूतांना बाहेर काढले आहे. दोनही देशांनी एकमेकांवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. या संघर्षात १५ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. यासह एक लाखांहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत.
खरं तर, सध्याच्या युद्धाचे केंद्रबिंदू ठरलेले ‘प्रसात ता मुएन थॉम’ (Ta Muen Thom) हे प्राचीन हिंदू मंदिर थायलंड-कंबोडिया सीमेवरील एका डोंगररांगेवर वसले असून ते भगवान शिवाला समर्पित आहे. या मंदिराच्या गर्भगृहात एक स्वयंभू शिवलिंग आहे, जे शिवलिंग निसर्गाच्या क्रियेतून, जसे की दगडांच्या घर्षणातून किंवा इतर नैसर्गिक प्रक्रियेतून तयार झाले आहे. ख्मेर साम्राज्याखाली बांधलेले, हे केवळ कंबोडियन लोकांसाठीच नाही तर त्यांच्या थाई शेजाऱ्यांसाठी देखील एक धार्मिक स्थळ आहे. सीमेवर तीन हिंदू मंदिरांचे संकुल आहे, ज्यामध्ये ‘ता मुएन थॉम’, ‘ता मुएन’ आणि ‘ता मुएन तोच’ मंदिरांचा समावेश आहे.
या मंदिरात नैसर्गिक खडकांतून साकारलेला शिवलिंग आणि संस्कृत शिलालेख आहेत, जे प्राचीन भारतीय संस्कृतीचा आणि कलांचा प्रभाव दाखवतात. प्रसात टा मुएन थॉम (ख्मेर भाषेत “ग्रँडफादर चिकनचे महान मंदिर”) हे ख्मेर हिंदू मंदिर राजा उदयादित्यवर्मन II यांच्या कारकिर्दीत ११व्या शतकात बांधले गेले आहे.
दरम्यान, दोनही देशात वाद होण्याचे कारण म्हणजे १९६२ मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (ICJ) मंदिराचा अधिकार कंबोडियाला दिला होता, परंतु परिसरातील ४–४.६ चौरस किलोमीटर भागावर थायलंड दावा करत आहे आणि अजूनही त्यावर ठाम आहेत. हा वाद सुरु असताना २००८ मध्ये कंबोडियाने हे मंदिर युनेस्कोच्या जागतिक वारशांच्या यादीत समाविष्ट केले. मात्र, असे केल्याने तणाव आणखी वाढला.
हे ही वाचा :
बांगलादेशात महिलांच्या कपड्यांवर निर्बंध…तालिबानी राजवट सुरू झाल्याची टीका
माधवराव पेशव्यांच्या निजामावरील विजयाचा उत्सव १० ऑगस्टला
थायलंड-कंबोडिया सीमा संघर्षात १५ जणांचा मृत्यू!
मणिपूरमधील राष्ट्रपती राजवट आणखी ६ महिन्यांसाठी वाढवली!
आता हा वाद इतका वाढला आहे कि दोनही देश युद्धासाठी एकमेकांसमोर उभे आहेत. हा संघर्ष उफाळण्याचे कारण म्हणजे, २४ जुलै रोजी ता मुएन थॉम मंदिराच्या परिसरात झालेला लँडमाइन स्फोट. या स्फोटामुळे थाई सैनिक जखमी झाले आणि या घटनेनंतर दोन्ही देशांमध्ये सीमावार तीव्र संघर्ष सुरु झाला.
यानंतर गोळीबार, हवाई हल्ले झाले. थाईलंडने F‑२६ जेट्सचे एअर स्ट्राईक केले आणि कंबोडियाने BM‑२१ रॉकेटसह मोर्टार अटॅक्स केले. दोन्ही बाजूंनी नागरिक भागात हल्ले केले. या युद्धात १५ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका सैनिकाचा समावेश आहे. दोनही बाजूने सीमा बंद करण्यात आल्या आहेत. दरम्यान, चीन, मलेशिया आणि आशिया-पॅसिफिक समुदायाने तत्काळ शांतता आग्रह केला.







