मीडिया रिपोर्ट्सनुसार, योगी युथ ब्रिगेडचे अध्यक्ष कुंवर अजय तोमर म्हणाले की, अखिलेश यादव यांनी मुस्लिम मतपेढीसाठी डिंपल यादव यांच्या अपमानावर भाष्य केले नाही. तोमर म्हणाले, “पण आम्ही ते सहन करणार नाही. आम्ही या मौलानाची हाडे मोडू आणि त्याला मारहाण करू. त्याला अशा प्रकारे मारहाण केली जाईल की तो स्वप्नातही कोणत्याही हिंदू महिलेचा अपमान करणार नाही.”
ते पुढे म्हणाले, “इस्लाममध्ये मुस्लिम महिलांचा आदर केला जात नाही, तिहेरी तलाक आणि हलालाच्या नावाखाली त्यांचे शोषण केले जाते. त्यांना मुले जन्माला घालण्याची मशीन मानले जाते.”
हे ही वाचा :
ताजमहाल पाहून का अवाक झाली अनन्या पांडे?
‘ऑपरेशन महादेव’: दोन हल्लेखोरांचे फोटो आले समोर!
पुतीन यांच्याकडे ५० नाहीतर केवळ १२ दिवस नाहीतर निर्बंधांना सामोरे जा!
दरम्यान, एका टीव्ही शो दरम्यान मौलाना साजिद यांनी डिंपल यादव यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यांनी म्हटले होते की , “दोन महिला मशिदीत आल्या होत्या. एकीने स्वतःला झाकले होते. दुसरी महिला डिंपल यादव आहे, तिच्या पाठीचा फोटो पहा. ती नग्न बसली आहे.” मौलाना साजिद यांच्या या टिप्पणीवरून सपा कार्यकर्ते विविध ठिकाणी निदर्शने करत आहेत. कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.







