पाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्याला ठोकल्या बेड्या

पाकिस्तानचे गोडवे गाणाऱ्याला ठोकल्या बेड्या

उत्तर प्रदेशमधील नावाबगंज भागात राहणाऱ्या इम्रान नावाच्या व्यक्तीने पाकिस्तान समर्थनार्थ एक पोस्ट त्याच्या सोशल मीडिया खात्यावर टाकल्याप्रकरणी पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्या या कृत्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत होता. पोलिसांनी अखेर त्याचा शोध घेऊन त्याला अटक केले असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

इम्रान याने त्याच्या इन्स्टाग्रामच्या खात्यावर पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणारा मजकूर लिहिला होता. त्याच्या या पोस्टमुळे अनेक सोशल मीडिया वापर करणाऱ्यांच्या भावना दुखावल्या. त्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक राज कुमार शर्मा यांनी दिली.

हेही वाचा..

बेंगळुरू वाणिज्य दूतावासात व्हिसा ऑपरेशन्स सुरु करण्यास प्राधान्य

शेख हसीना आणि बहिणीला ठार मारण्याचा कट होता!

सोलापूरच्या बार्शीमधून सहा बांगलादेशींना घेतले ताब्यात

युद्धविराम, ओलीस सोडण्याच्या कराराला इस्रायल सरकारकडून हिरवा कंदील

भारतात राहून पाकिस्तानचे गोडवे गायचे हा प्रकार पहिल्यांदा समोर आला आहे असे नाही. यापूर्वी सुद्धा अनेकदा अशा घटना देशातील विविध राज्यात घडल्या आहेत. त्यामुळे अशा प्रवृत्तीच्या लोकाना वेळीच लगाम घालणे आवश्यक आहे,

Exit mobile version