28 C
Mumbai
Monday, April 20, 2026
घरविशेषआशाताईंच्या चतुरस्त्र गायकीने तृप्त केले!

आशाताईंच्या चतुरस्त्र गायकीने तृप्त केले!

Google News Follow

Related

प्रख्यात गायिका आशा भोसले यांचे रविवारी ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले आणि त्यांनी गायलेल्या असंख्य गाण्याचा एक पट प्रत्येकाच्या डोळ्यासमोर उलगडू लागला. सर्वप्रकारची, विविध भाषांतली त्यांची गाणी कानात रुंजी घालू लागली. शास्त्रीय संगीताच्या आधारावर गायलेली गाणीच नव्हेत भावगीते, सुगम संगीत, पॉप, रॉक, गझल अशा विविध धाटणीची गाणी आशाताईंनी लिलया गायली आणि अवघ्या जनमानसावर त्या गायकीचे संस्कार केले. अवघ्या तरुणाईला थिरकायला लावणारी त्यांची गाणी, विविध संगीतकारांना न्याय देणारी त्यांची गाणी, विविध गायकांसोबत गायलेली गाणी आठवू लागली आहेत. मराठी गीतसंगीत विश्वाचीही त्यांनी खूप सेवा केली. उठी गोविंदा उठी गोपाळा, एका तळ्यात होती बदके, उठी श्रीरामा पहाट झाली, का रे दुरावा, चंद्र आहे साक्षीला, गंध फुलांचा गेला सांगून, गेले द्यायचे राहून, घन रानी साजणा, जीवलगा राहिले रे दूर, चांदण्यात फिरताना, डोळे हे जुल्मी गडे, तरुण आहे रात्र अजूनी, चांदणे शिंपित जाशी, कानडा ओ विठ्ठलू अशी असंख्य गाणी कायम मराठी मनावर राज्य करत राहणार आहेत.

हे ही वाचा:

सुरांची आशा हरपली!

तुमचं घर जिहादपासून सुरक्षित आहे का?

SIR योजनेमुळे मतदारयादीतून काढली ५ कोटी नावे

नागपूर बनणार नवीन बिझनेस हब

हिंदीतल्या गाण्यांनीही अनेक दशके कानांना तृप्त केले.

मेरा कुछ सामान, चुरा लिया है तुमने जो दिलको, ये वादा रहा, कहदू तुम्हे, अभी ना जाओ छोडकर, जानू मेरी जाँ, किताबे बहोत सी पढी होंगी तुमने, पिया तू अब तो आजा, इशारों इशारों मे, दो लफ्जो की है, ओ मेरे सोना रे, गुन गुना रहे है भवरे, दिवाना हुआ बादल, जरा सा झूम लू मै, एक हसिना थी, दम मारो दम, तनहा तनहा, उडे जब जब जुल्फे तेरी, क्या खबर थी जाना, ना तो कारवाँ की तलाश है, किसी नजर को तेरा, जवाने जानेमन, पूछो ना यार क्या हुआ, इन आँखो की मस्ती मे, रंगीला रे, और इस दिल मे, तुमसे मिलके, इन्तेहा हो गई, अच्छा जी मे हारी, रात बाकी बात बाकी, बचके रहना रे बाबा अशा हजारो गाण्यांनी चित्रपटसृष्टीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
303,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा