भारतीय संगीतसृष्टीतील दिग्गज गायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर संगीत विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या आयुष्याचा प्रवास फक्त संगीतापुरता मर्यादित नव्हता, तर त्यांनी एक यशस्वी उद्योजिका म्हणूनही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. अनेक त्यांच्या ओळखीचे लोक सांगतात की ताईंना गाण्यासोबतच खाण्याचाही व्यासंग होता. इतकेच नव्हे तर खाणे बनवण्यात देखील त्यांना रस होता.
आशा भोसले यांनी जवळपास आठ दशकांचा दीर्घ संगीत प्रवास केला. त्यांनी १२ हजारांहून अधिक गाणी विविध भाषांमध्ये गायली आहे. पण फक्त गायनातच नाही, तर व्यवसायात देखील चांगली कामगिरी केली आहे. ‘Asha’s’ या नावाने त्यांनी आंतरराष्ट्रीय रेस्टॉरंट चेन उभी केली. २००२ मध्ये दुबईमध्ये सुरू झालेला हा व्यवसाय नंतर कुवैत, बहरीन, अबू धाबी, कतार तसेच यूकेमधील लंडन, मँचेस्टर आणि बर्मिंघमपर्यंत विस्तारला. हा ब्रँड प्रीमियम भारतीय खाद्यपदार्थांसाठी ओळखला जाऊ लागला आहे.
हे ही वाचा:
‘आशा भोसले यांच्या निधनामुळे संगीताच्या दुनियेत मोठी पोकळी’
कॉर्पोरेट धर्मांतरणाविषयी नाशिकमधील टीसीएस कंपनीने दिले स्पष्टीकरण
आशाताईंच्या चतुरस्त्र गायकीने तृप्त केले!
मुंबई–बेंगळुरू वंदे भारत स्लीपर ट्रेनला मंजुरी; रात्रीतच होणार जलद प्रवास
यासोबतच मुंबईतील पेडर रोडवरील ‘प्रभुकुंज’ हे त्यांचे सर्वात प्रसिद्ध घर होते. याशिवाय मुंबई आणि पुण्यात त्यांच्याकडे अनेक आलिशान फ्लॅट्स आणि मालमत्ता होत्या, ज्यांची किंमत कोट्यवधी रुपयांत होती.
विशेष म्हणजे, सुरुवातीच्या काळात त्यांना त्यांच्या बहिणी लता मंगेशकर यांच्या तुलनेत खूपच कमी मानधन मिळत असे. मात्र, त्यांनी आपल्या वेगळ्या शैलीच्या जोरावर स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केले आणि पुढे प्रचंड यश मिळवले.
एकूणच, आशा भोसले यांनी केवळ गाण्यांमधूनच नव्हे तर हुशार गुंतवणूक आणि व्यवसायातूनही मोठी संपत्ती उभी केली. त्यांनी मागे सोडलेली ही आर्थिक आणि सांस्कृतिक परंपरा आजही प्रेरणादायी आहे.







