25 C
Mumbai
Tuesday, December 16, 2025
घरविशेषराज्यात आयुष्मान भारत, फुले जन आरोग्य योजनेचा मोठा विस्तार

राज्यात आयुष्मान भारत, फुले जन आरोग्य योजनेचा मोठा विस्तार

२३९९ उपचार कॅशलेस; रुग्णालयांवर कडक नियंत्रण

Google News Follow

Related

राज्यात एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत महत्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत. यामुळे आरोग्यव्यवस्थेतील कार्यक्षमता, पारदर्शकता आणि सेवा गुणवत्तेत मोठी होत आहे.जानेवारी २०२५ पासून उपचारांची संख्या १३५६ वरून २३९९ पर्यंत वाढविण्यात आली असल्याची माहिती राज्य आरोग्य हमी सोसायटी मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी दिली.

उपचार पॅकेजच्या दरात वाढ करून रुग्णालयांना दर्जेदार सेवा देण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले आहे. NABH व NQAS मानक पूर्ण करणाऱ्या रुग्णालयांना १० ते १५ टक्के अतिरिक्त प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. योजनेची प्रभावी अंमलबजावणी व तक्रार निवारणासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सनियंत्रण व तक्रार निवारण समिती तसेच पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय जन आरोग्य संरक्षण कार्यकारिणी कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा..

सागरी सुरक्षेसाठी १५ हाय स्पीड गस्ती नौका लवकरच

मालवणी परिसराच्या पुनर्विकासासाठी ‘क्लस्टर मॉडेल’ विकसित करा

सातारा-कागल राष्ट्रीय महामार्गाचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण

दिव्यांग – अव्यंग विवाह योजनेच्या अनुदानात वाढ

नागरिकांच्या सोयीसाठी २४ तास टोल फ्री कॉल सेंटर उपलब्ध असून, १५५३८८ / १८०००२३३२२०० व १४५५५ / १८००१११५६५ या क्रमांकांवर माहिती व तक्रारी नोंदवता येणार आहेत.योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया, तपासण्या, औषधे, इम्प्लांट्स, जेवण व एक वेळचे प्रवास भाडे पूर्णपणे मोफत व कॅशलेस देणे रुग्णालयांना बंधनकारक असून, उपचार नाकारल्यास किंवा रक्कम मागितल्यास संबंधित रुग्णालयावर दंड, निलंबन किंवा अंगीकरण रद्द करण्याची कठोर कारवाई करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व या योजनेस पात्र आहे, नागरिकांनी आपल्या हक्कांबाबत जागरूक राहून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा