२०१२ मध्ये हाकलून लावलेले बांगलादेशी अजमेर दर्ग्याजवळ आढळले, दोघांना अटक!

राजस्थान एसटीएफची कारवाई

२०१२ मध्ये हाकलून लावलेले बांगलादेशी अजमेर दर्ग्याजवळ आढळले, दोघांना अटक!

देशासह राज्यभरात बांगलादेश-रोहिंगे बेकादेशीररित्या वास्तव्यास असल्याचे समोर आले आहे, येत आहे. राज्यातील पोलीस पथके विशेष मोहीम राबवत अशा घुसखोरांवर कारवाई करत त्यांना पकडण्याचे काम करत आहेत. अटक करण्यात आलेल्यांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांची पुन्हा त्यांच्या देशात रवानगी करण्यात येत आहे. याच दरम्यान, राजस्थानच्या अजमेर मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. २०१२ मध्ये अटक करून बांगलादेशला रवानगी करण्यात आलेले दोन घुसखोर बांगलादेशी अजमेरमध्ये सापडले आहेत.

आलमगीर आणि शाहीन अशी त्यांची नावे असून एसटीएफने कारवाई करत दोघांना अटक केली आहे. हे दोघेही अजमेरच्या दर्गा परिसरात राहत होते. एसटीएफने बेकायदेशीर घुसखोरांना पकडण्यासाठी मोहीम राबविली होती. या मोहिमेद्वारे दोघांना ताब्यात घेण्यात आले.

पोलीस चौकशीत घुसखोरांनी सांगितले की, २०१२ मध्ये पकडण्यात आले होते. त्यानंतर कारवाई करत भारतातून बाहेर काढण्यात आले. पण पुन्हा बांगलादेशची सीमा ओलांडून भारतात शिरकाव केला आणि अजमेरमध्ये राहू लागला. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत दोघांनाही ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरु आहे. यासोबतच पोलिसांनी या परिसरात राहणाऱ्या दोन डझनहून अधिक लोकांची चौकशी केली आहे.

हे ही वाचा : 

अभिभाषणानंतर सोनिया, राहुल यांच्याकडून राष्ट्रपतींची खिल्ली!

देशाची अर्थव्यवस्था ६.३ ते ६.८ टक्के दराने वाढणार

शिक्षण, रोजगार, महिला सक्षमीकरणावर विशेष लक्ष केंद्रित, तिसऱ्या टर्ममध्ये तिप्पट वेगाने काम सुरु!

महाकुंभ: अमृत स्नानाच्या दिवशी व्हीआयपी प्रवेशावर बंदी!

Exit mobile version