26 C
Mumbai
Thursday, February 19, 2026
घरविशेषबांगलादेश: महामाया देवीच्या मूर्तीची तोडफोड!

बांगलादेश: महामाया देवीच्या मूर्तीची तोडफोड!

तोडफोडीचे व्हिडीओ व्हायरल

Google News Follow

Related

बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांनी जरी सर्व काही योग्य मार्गावर असल्याचा दावा केला असला तरी, तेथील हिंदूंवरील हल्ले थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. पुन्हा एकदा हिंदू मंदिरावर हल्ला झाला आहे. लक्ष्मीपूर जिल्ह्यातील रायपूर येथील मुरीहाटा भागात असलेल्या श्री महामाया मंदिरात हल्लेखोराने प्रवेश करत महामाया देवीच्या मूर्तीची विटंबना केली आहे.

ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, मंदिर समितीचे सरचिटणीस विश्वनाथ साहा म्हणाले की, होळीच्या दिवशी गुरुवारी (१३ मार्च) संध्याकाळची प्रार्थना संपल्यानंतर पुजारी मंदिरातून निघून गेले होते. त्यानंतर रात्री जेव्हा पुजारी पुन्हा मंदिरात परतले तेव्हा देवीच्या मूर्तीची तोडफोड केल्याचे समोर दिसले. यानंतर पुजाऱ्याने स्थानिक हिंदू समुदायाला फोन करून घटनेची माहिती दिली.

हे घृणास्पद कृत्य तिथे बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक मुखवटा घातलेला माणूस मंदिराच्या आवारात घुसून मूर्तीचे नुकसान करत पळून जाताना दिसत आहे. मंदिर समितीचे सरचिटणीस विश्वनाथ साहा म्हणाले की, या घटनेबाबत गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

हे ही वाचा : 

विराट कोहली आरसीबी संघात सामील

वेंकटेश अय्यरला येतेय २३.७५ कोटी रुपयांचा दबाव

मजल्यावर मजले, तारीख पे तारीख, मुक्काम पोस्ट डोंगरी…

आयपीएलच्या काही सामन्यांमधून बुमराह आऊट

दरम्यान, लक्ष्मीपूर पूजा उत्सव परिषदेने या घटनेला जबाबदार असलेल्यांची ओळख पटवून त्यांना २४ तासांच्या आत अटक करण्याची मागणी केली आहे. घटनेची माहिती मिळताच रायपूर पोलिस ठाण्याचे प्रभारी निजाम उद्दीन भुईया यांनी इतर अधिकाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणी तपास सुरु करून लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल.

बांगलादेशात हिंदू मंदिरांचे नुकसान होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही मुस्लिम बहुसंख्य लोकसंख्येकडून हिंदू मंदिरे आणि हिंदू अल्पसंख्याकांना लक्ष्य करण्यात आले आहे. भारत सरकारच्या मते, गेल्या वर्षी म्हणजेच ८ डिसेंबर २०२४ पर्यंत, बांगलादेशमध्ये हिंदूंविरुद्ध हिंसाचाराच्या २२०० हून अधिक घटना नोंदवल्या गेल्या आहेत. यावर्षी देखील तशीच परिस्थिती दिसत आहे, कारण वर्षाच्या सुरवातीपासून अत्याचाराच्या दररोज घटना समोर येत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
293,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा