बिहारच्या स्पेशल टास्क फोर्सने टिपला एक नक्षलवादी!

एक लाखांचे होते बक्षीस, परिसरात शोध मोहीम सुरु

बिहारच्या स्पेशल टास्क फोर्सने  टिपला एक नक्षलवादी!

बिहारमधील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका स्वीकारली आहे. बिहार पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सच्या पथकाने कुख्यात नक्षलवादी रमेश टुडू उर्फ ​​तेंटुआ (३३) याला ठार मारले आहे. बांका येथील कलोथर जंगलात पथकाने ही कारवाई केली. बिहार पोलिसांचे पथक गेल्या अनेक महिन्यांपासून या नक्षलवाद्याचा शोध घेत होते. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी त्याच्यावर एक लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते. अखेर त्याचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे.

मंगळवारी (८ एप्रिल) रात्री उशिरा पोलिसांना माहिती मिळाली की नक्षलवादी टेंटुआ त्याच्या साथीदारांसह कलोथर जंगलात लपला आहे. गुप्त माहितीच्या आधारे पथकाने जंगल परिसरात शोधमोहीम सुरु केली. याच दरम्यान, जंगलात लपलेल्या तेंटुआ त्याच्यासोबत असलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला.

पोलिसांनी प्रत्युत्तर दिले आणि या चकमकीत नक्षलवादी टेंटुआ ठार झाला. डोक्यात आणि छातीत गोळी लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तथापि, इतर नक्षलवादी पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांच्या शोधासाठी पोलिस शोध मोहीम राबवत आहेत.

हे ही वाचा : 

पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना विजय दिवस परेडसाठी दिले आमंत्रण

‘वक्फ बोर्डा’चे समर्थन करणाऱ्या पक्षाला गावबंदी!

रामलल्लांचे सूर्य तिलक हे पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेचे फळ

ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरवर भारताची रणनीती ठरली! काय म्हणाले एस जयशंकर?

बिहार पोलिसांच्या मते, सुमारे पाच नक्षलवादी जंगलात लपले होते. या माहितीच्या आधारे, पोलिस नक्षलवाद्यांना अटक करण्यासाठी पोहोचले होते पण त्यांनी गोळीबार सुरू केला. पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात नक्षलवादी टेंटुआला गोळी लागली. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.

Exit mobile version