‘वक्फ दुरुस्ती विधेयक’ संसदेत मंजूर झाल्यानंतर त्याच्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली आणि त्याचे कायद्यात रुपांतर झाले. या विधेयकावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये बरीच टीका-टिप्पणी, वादविवाद झाले. मात्र, अखेर मतांच्या आधारे हे विधेयक पास झाले. विधेयक मंजूर झाले, मात्र वाद अजूनही सुरूच आहेत. यावरून विरोधक सरकारवर टीका करत आहेत. याच दरम्यान, वक्फ बोर्डाचे समर्थन करणाऱ्या पक्षाला गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील सुळेवाडी गावाने हा निर्णय घेतला. तसेच गावात प्रवेश केल्यास पुढील परिणामास ते स्वतः जबाबदार राहतील, अशा इशारा देखील देण्यात आला आहे. या गावबंदी संदर्भात सुळेवाडी ग्रामपंचायतीकडून जागोजागी बॅनर लावण्यात आले आहेत.
वक्फ दुरुस्ती विधेयक संसदेत मांडल्यानंतर लोकसभेत त्याच्या बाजूने २८८ मते तर विरोधात २३२ मते पडली. लोकसभेच्या पाठोपाठ राज्यसभेत देखील गुरुवारी (३ एप्रिल) रात्री १२ तासांच्या चर्चेनंतर मध्यरात्री २.३० वाजता विधेयकाच्या बाजूने १२८ तर विरोधात ९५ मते पडली. यानंतर वक्फ दुरुस्ती विधेयक संसदेत मंजूर झाले. मात्र, अजूनही विरोधकांकडून याचा विरोध केला जात आहेत. मुस्लीम संघटनांकडून देशातील काही भागात निदर्शने केली जात आहेत. असे असताना सुळेवाडी गावाने घेतलेल्या निर्णयाची सर्वत्र चर्चा आहे.
हे ही वाचा :
रामलल्लांचे सूर्य तिलक हे पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेचे फळ
भारताला फ्रान्सकडून २६ राफेल मरीन जेट्स मिळणार!
हिंदूंवरील आक्षेपार्ह विधानानंतर भाजपा- आप आमदारांमध्ये हाणामारी
रेल्वेच्या डब्यात विनातिकीट बुरखाधारी महिलेचा थयथयाट, प्रवाशाला तुकडे करण्याची धमकी
वक्फ बोर्डाचे समर्थन करणाऱ्या पक्षाला गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. तशा प्रकारचे बॅनर ग्राम पंचायतीकडून लावण्यात आले आहेत. यामध्ये म्हटले, सुळेवाडी (सुंदरपूर), वक्फ बोर्ड विरोधी समिती, ज्या पक्षांनी वक्फ बोर्डाचे समर्थन केले आहे, त्या सर्व धर्मविरोधी पक्षांना गावात येण्यास मनाई आहे.
पुढे म्हटले, जर गावात कोणी प्रवेश केला तर पुढील परिणामास ते स्वतः जबाबदार राहतील. ज्यांच्यात हिंदुत्व जिवंत आहे फक्त आणि फक्त तेच लोक समर्थन करतील, असे ग्राम पंचायतीने म्हटले आहे. दरम्यान, गावाने घेतलेल्या या निर्णयाचे अनेकांकडून स्वागत करण्यात येत आहे.
हिंदू धीर धीरे ही सही पर अब जाग रहा है 🔥💪
महाराष्ट्र के गांव के बाहर लगे बैनर
जिस सांसद ने वक्फ बोर्ड बिल का विरोध किया उनके लिए गांव में एंट्री बैन और उन्होंने गांव में कदम रखा तो उसका जिम्मेदार वो खुद होगा
हिंदुओं इसे हर राज्य में अमल करना जरूरी हे
जय श्रीराम 🚩🙏 pic.twitter.com/rEyLY0DIEA
— Amrendra Bahubali 🇮🇳 (@TheBahubali_IND) April 9, 2025