29 C
Mumbai
Thursday, February 5, 2026
घरविशेषबिहारमध्ये ५ ते १५ नोव्हेंबरदरम्यान तीन टप्प्यात निवडणुकीची शक्यता!

बिहारमध्ये ५ ते १५ नोव्हेंबरदरम्यान तीन टप्प्यात निवडणुकीची शक्यता!

मुख्य निवडणूक आयुक्तांचा पुढील आठवड्यात बिहार दौरा 

Google News Follow

Related

२८ ऑक्टोबर रोजी येणाऱ्या छठपूजेनंतर ५ ते १५ नोव्हेंबर दरम्यान बिहार विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी इंडिया टुडे टीव्हीला सांगितले. सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ २२ नोव्हेंबर २०२५ रोजी संपेल आणि मतदान पॅनेलला त्या तारखेपूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार पुढील आठवड्यात निवडणुकीच्या तयारीचा आणि ३० सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीचा आढावा घेण्यासाठी बिहारला भेट देतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

निवडणूक आयोगाने अलीकडेच राबवलेल्या विशेष सघन पुनरीक्षण मोहिमेमुळे देशातील राजकीय वातावरण तापले आहे. या मोहिमेदरम्यान मतदार यादीतून तब्बल ६५ लाख नावे वगळण्यात आली, ज्यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. इंडि आघाडीने निवडणूक आयोगावर टीका करत आरोप केला आहे की, “ही प्रक्रिया पारदर्शक नाही, आणि खरी मतदारांची नावे यादीतून हटवण्यासाठी मुद्दाम वापरली जात आहे.”

विरोधकांच्या मते, मतदार यादीतील मोठ्या प्रमाणावर झालेल्या नावांच्या वगळण्यामागे राजकीय हेतू असून, लोकशाही प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा हा प्रकार आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने इशारा दिला की, ३० सप्टेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही जर काही बेकायदेशीरता आढळली तर संपूर्ण प्रक्रिया रद्द केली जाईल .

मागील पद्धतीप्रमाणे, बिहारमध्ये पुन्हा एकदा बहु-टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. २०२० च्या निवडणुका तीन टप्प्यात पार पडल्या, ज्यामध्ये ७१ जागांसाठी २८ ऑक्टोबर रोजी, ९४ जागांसाठी ३ नोव्हेंबर रोजी आणि ७८ जागांसाठी ७ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. तर निकाल १० नोव्हेंबर रोजी जाहीर झाले. यासह २०१५ मध्ये, पाच टप्प्यांमध्ये मतदान झाले होते.

दरम्यान, या वर्षी होणारी निवडणूक पुन्हा एकदा सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि विरोधकांच्या इंडिया आघाडी यांच्यातच रंगणार आहे. एनडीएमध्ये भारतीय जनता पक्ष (भाजप), जनता दल (युनायटेड) आणि लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) यांचा समावेश असून, ही आघाडी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एक कार्यकाळ मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. दुसरीकडे, विरोधी पक्षांची इंडि आघाडी, ज्यामध्ये राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) आघाडीवर असून, कॉंग्रेस व डाव्या पक्षांचा सहभाग आहे, जो नितीश कुमार यांना सत्तेवरून हटवण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे.

हे ही वाचा : 

नौशादने ‘आकाश’ बनून केलं लग्न अन् चार मित्रांसह महिलेवर केला सामुहिक बलात्कार

विनापरवानगी मिरवणुकीत “आय लव्ह मोहम्मद”चे नारे; जाब विचारायला गेलेल्या पोलिसांवर हल्ला

“पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही” 

जीएसटी सुधारणा: शेतकऱ्यांकडून स्वागत, खत-ट्रॅक्टर स्वस्त, दीर्घकालीन फायदा!

२४३ सदस्यांच्या सभागृहात, एनडीएकडे सध्या १३१ सदस्यांसह बहुमत आहे – भाजप ८०, जेडी(यू) ४५, हिंदुस्थानी अवाम मोर्चा (धर्मनिरपेक्ष) ४ आणि २ अपक्षांचा पाठिंबा. इंडि आघाडीमध्ये १११ आमदार आहेत, ज्यामध्ये आरजेडी ७७, काँग्रेस १९, सीपीआय(एमएल) ११, सीपीआय(एम) २ आणि सीपीआय २ आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
290,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा