बिल गेट्स यांनी चक्क बनवल्या पोळ्या..मोदी म्हणाले, उत्कृष्ट

शेफ ईटन बर्नाथ बनवलेल्या पोळीचा आस्वाद

बिल गेट्स यांनी चक्क बनवल्या पोळ्या..मोदी म्हणाले, उत्कृष्ट

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी चक्क भारतीय पोळ्यांची लज्जत चाखली आहे. विषेश म्हणजे त्या पोळ्या त्यांनी स्वतः बनवल्या आहेत. या पोळ्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये अब्जाधीश गेट्स भारतीय पोळी बनवताना दिसत आहेत. बिल गेट्स सेलिब्रिटी शेफ ईटन बर्नाथसोबत बिहारी स्टाईलमध्ये रोटी बनवताना दिसत आहेत. ईटन नुकताच बिहारहून परतला आणि तो बिल गेट्स यांना पोळ्या बनवण्याचे धडे देत आहे.

व्हिडिओमध्ये बिल गेट्स स्वतः फक्त कणिक मळताना दिसत आहेत. इतकेच नाही तर तव्यावर पोळी भाजताना दिसत आहेत. गेट्स पोळ्या करताना खूप आनंदी आणि उत्साहित दिसत आहेत. पोळी बनवल्यानंतर बिल गेट्स यांनी शेफ ईटन बनर्थ यांच्यासोबत तुपासोबत ती खाल्ली आणि भारतीय पोळीचे खूप कौतुक केले. भारत दौऱ्यात मी पोळी बनवायला शिकलो. बिहारला गेलेलो असतांना ‘दीदी की रसोई’ कॅन्टीनमधील महिलांकडून पोळ्या बनवायला शिकलो, असे शेफ बनर्थने सांगितले.

हे ही वाचा:

गोड वाणी झाली निशब्द… गायिका वाणी जयराम यांचे निधन

आव्हाड आहेत, म्हणून इतिहास आहे!

…हे म्हणजे आपल्या गल्लीत वाघ ठरण्यासारखे!

राम मंदिर उडवण्याची धमकी; आठ संशयितांच्या मुसक्या आवळल्या

पंतप्रधान मोदी म्हणाले, उत्कृष्ट…

शेफने बिल गेट्सचा पोळ्या बनवतानाचा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्यांचे कौतुक केले. इंस्टाग्रामवर गेट्सच्या व्हिडीओचा स्क्रीनशॉट शेअर करत पंतप्रधान मोदींनी लिहिले की, “उत्तम, तुम्ही खूप चांगली पोळी बनवली आहे.”

बाजरीचे पदार्थ बनवा पंतप्रधानांनी सुचवले

पंतप्रधानांनी बिल गेट्स यांना बाजरीचे पदार्थ बनवण्यास सुचवले आहे . कौतुक करताना पंतप्रधान म्हणाले, बाजरीचे पदार्थ बनवण्याचाही प्रयत्न करावा. पंतप्रधान म्हणाले की आजकाल भारतात बाजरीच्या अन्नाची खूप चर्चा आहे, जे लोकांना निरोगी ठेवण्यासाठी देखील ओळखले जाते. त्यासोबत पंतप्रधानांनी स्मायली इमोजीही पाठवले

Exit mobile version