26 C
Mumbai
Thursday, March 23, 2023
घरधर्म संस्कृतीराम मंदिर उडवण्याची धमकी; आठ संशयितांच्या मुसक्या आवळल्या

राम मंदिर उडवण्याची धमकी; आठ संशयितांच्या मुसक्या आवळल्या

एनआयएची छापेमारी

Google News Follow

Related

अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिर उडवून देण्याची धमकी मिळाली देण्यात आली होती . अयोध्येतील राम मंदिराचे नुकसान करण्याचा कट रचल्याच्या माहितीवरून पाटणा एनआयएच्या पथकाने मोतिहारी येथे छापा टाकून अनेक संशयितांना ताब्यात घेतले आहे.

चकिया पोलीस ठाण्याच्या कुआवा गावात छापा टाकून आठ जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना पाटण्याला नेण्यात आल्याची माहिती आहे. नेपाळमधील जनकपूर धामच्या गंडकी नदीतील शाळीग्राम ३१ जानेवारीला पूर्व चंपारणमार्गे अयोध्येत नेण्यात आला होता.

पूर्व चंपारणमधील चकियामार्गे शाळीग्राम नेट असताना व्हिडीओ कॉल करून बदला घेतल्याचा व्हिडीओ सोशल मीडिया, फेसबुकवर समोर आला. यामध्ये ‘अयोध्येत बाबरी मशीद नाही तर श्री राम मंदिर होणार नाही’, असे सांगत श्री राम मंदिर उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. यानंतर काल रात्री एनआयए पटनाच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने छापा टाकला. छाप्यात आठ जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये पीएफआय नेता रियाझ मारूफचाही समावेश आहे. अलीकडेच पाटणा येथील फुलवारी शरीफ येथे पीएफआय प्रशिक्षण केंद्र चालवल्याच्या खुलाशात रियाझ मारूफचे नाव समोर आले आहे. यानंतर पाटणा, लखनौ आणि दिल्लीतील एनआयएच्या पथकाने चकियाच्या कुआनवा गावात छापा टाकला.

हे ही वाचा:

पी. चिदंबरम यांच्या पत्नीची संपत्ती ईडीकडून जप्त

मध्य रेल्वे मार्गावर रविवार ५ फेब्रुवारीला मेगा ब्लॉक, जाणून घ्या वेळ…

अजितदादांच्या मते उद्धव ठाकरेंमुळे सरकार कोसळलं?

सॅमसंगचे आता भारतातच ‘स्मार्ट’ उत्पादन

एनआयएच्या पाटणा, लखनौ आणि दिल्लीच्या पथकांनी चकियाच्या कुनावा गावात छापे टाकले, पण रियाझ मारूफ पकडला गेला नाही.काल रात्री पडलेल्या छाप्यात गँगस्टर रियाज मारूफ यालाही अटक केल्याची माहिती आहे. मात्र, या कारवाईत कोणाला ताब्यात घेण्यात आले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही .

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,882चाहतेआवड दर्शवा
2,029अनुयायीअनुकरण करा
65,200सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा