29.2 C
Mumbai
Saturday, July 11, 2026
घरस्पोर्ट्सफिफा विश्वचषक फुटबॉल : इराण - न्यूझीलंड सामन्यात २-२ बरोबरी

फिफा विश्वचषक फुटबॉल : इराण – न्यूझीलंड सामन्यात २-२ बरोबरी

पहिल्या विजयापासून न्यूझीलंडला रोखले

Google News Follow

Related

सोमवारी लॉस एंजेलिस येथील स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या ग्रुप ‘जी’ मधील पहिल्या सामन्यात इराण संघाने दोनदा पिछाडीवरून पुनरागमन करत न्यूझिलंडविरुद्ध २-२ अशी बरोबरी साधली आणि न्यूझीलंडला त्यांचा पहिला फिफा विश्वचषक विजय मिळवण्यापासून रोखले.

रामिन रेझायिन याचे या सामन्यात महत्त्वाचे योगदान होते. त्याने इराणसाठी पहिला गोल केला आणि दुसऱ्या बरोबरीच्या गोलातही मोलाची भूमिका बजावली. न्यूझीलंडसाठी एलिझा जस्ट याने ख्रिस वूड यांच्या सहाय्याने दोन गोल केले. त्यामुळे ‘ऑल व्हाईट्स’ने दोनदा आघाडी घेतली, पण अखेरीस त्यांना एका गुणावर समाधान मानावे लागले.

सामन्याची सुरुवात अत्यंत वेगवान झाली. इराणचा स्टार खेळाडू मेहदी तारेमी याचा शॉट न्यूझीलंडचा गोलरक्षक मॅक्स क्रोकोम्ब याने रोखला. त्यानंतर एलिजा जस्टने जोरदार लो-शॉट मारत न्यूझीलंडला आघाडी मिळवून दिली. क्रिस वुडने पहिल्या गोलमध्ये मदत केली आणि काही वेळानंतर आणखी एक संधी निर्माण केली. त्याने सरप्रित सिंग याला पास दिला, मात्र त्याचा शॉट इराणचा गोलरक्षक अलिरेझा बायरांवांद याने उत्कृष्ट बचाव करत रोखला.

इराणने पुनरागमनाचा प्रयत्न सुरू ठेवला. वॉटर ब्रेकपूर्वी मेहदी तारेमीचा २० यार्डवरून मारलेला शॉट गोलपोस्टला लागला. ब्रेकनंतर इराण अधिक जोमाने खेळला आणि लवकरच बरोबरी साधली. रेजाईनने बचावफळी भेदत शांतपणे गोल करत स्कोअर १-१ केला.

हे ही वाचा:

बोरिवलीत पेट्रोल पंपावर थरार

विजयाची घोडदौड कायम ठेवण्यासाठी भारत सज्ज

१५ दिवसांची मुदत संपली, आता आणखी महिनाभराची मागणी

एलन मस्क यांचे ‘क्वाड्रिलियनियर’ होण्याचे स्वप्न

दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच न्यूझीलंडने पुन्हा आघाडी घेतली. क्रिस वुडच्या पासवर एलिजा जस्टने पुढे आलेल्या गोलरक्षकावरून अप्रतिम शॉट मारत गोल केला. मात्र इराण फार वेळ मागे राहिला नाही. रेजाईनने मोहम्मद मोहेब्बीला अचूक क्रॉस दिला आणि मोहम्मद मोहेब्बी याने हेडरद्वारे शानदार गोल करत स्कोअर २-२ असा बरोबरीत आणला.

सामन्याच्या अखेरच्या क्षणांत दोन्ही संघांनी विजयासाठी प्रयत्न केले, पण निर्णायक गोल झाला नाही. अतिरिक्त वेळेत क्रिस वुडचा हेडर थेट गोलरक्षकाच्या हातात गेला. न्यूझीलंड आता २२ जून रोजी इजिप्तविरुद्ध होणाऱ्या पुढील सामन्यात पहिल्या विश्वचषक विजयासाठी प्रयत्न करेल. तर इराणचा सामना बेल्जियमविरुद्ध होणार आहे.

लॉस एंजेलिसमधील हा सामना त्या दिवसातील चौथा ड्रॉ सामना ठरला. दिवसाची सुरुवात केप वेरदेने स्पेनसारख्या बलाढ्य संघाला रोखून केली होती.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा