28 C
Mumbai
Monday, October 5, 2026
घरक्राईमनामाबोरिवलीत पेट्रोल पंपावर थरार

बोरिवलीत पेट्रोल पंपावर थरार

रागाच्या भरात कर्मचाऱ्याला कारने चिरडण्याचा प्रयत्न

Google News Follow

Related

बोरिवली पूर्व परिसरातील एका पेट्रोल पंपावर रविवारी रात्री उशिरा एक धक्कादायक प्रकार घडला. सिगारेट पेटवण्यावरून झालेल्या वादातून एका वाहनचालकाने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला कारने चिरडण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात कर्मचाऱ्याला काही अंतरापर्यंत फरफटत नेण्यात आले. या प्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी संबंधित वाहनचालकावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बी. दुबे असे संशयित आरोपीचे नाव असून तो एका ऑटोमोबाईल शोरूममध्ये काम करतो. रविवारी रात्री तो आपल्या कारने पेट्रोल पंपावर आला होता. यावेळी त्याने सिगारेट पेटवण्याचा प्रयत्न केला असता, पंपावरील पर्यवेक्षकाने त्याला हटकले. यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. तपासात असे समोर आले आहे की, गेल्या महिन्यात याच पर्यवेक्षकाने दुबेच्या भावाला नोकरीवरून कामावरून काढून टाकले होते, ज्याचा राग दुबेच्या मनात होता.
हे ही वाचा:
भारताकडून हार, पाकिस्तानला दंड

अणुकरारापूर्वीच इराणला ९ अब्ज डॉलर्स

जपानवर २-१ मात करत भारत उपांत्य फेरीत, गुणतालिकेत अव्वल

१५ दिवसांची मुदत संपली, आता आणखी महिनाभराची मागणी
वाद वाढत गेल्याने दुबेने रागाच्या भरात कार सुरू केली आणि पर्यवेक्षकाला चिरडण्याच्या उद्देशाने अंगावर घातली. यावेळी प्रसंगावधान राखून पर्यवेक्षकाने कारचे बोनेट घट्ट पकडले, मात्र दुबेने गाडी तशीच पुढे नेल्याने तो काही अंतरापर्यंत फरफटत गेला. या गोंधळात दुबेने पंपावरील इतर काही वाहनांनाही धडक दिली.
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले असून, त्यात संपूर्ण थरार कैद झाला आहे. घटनेची माहिती मिळताच कस्तुरबा मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दुबेला ताब्यात घेतले. तो मद्यधुंद होता की नाही, हे वैद्यकीय तपासणीनंतर स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. सोमवारी या प्रकरणी अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
336,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा