29.1 C
Mumbai
Monday, June 22, 2026
घरक्राईमनामाभाजप वॉर्ड अध्यक्ष सूरज प्रतापसिंहने केले लैंगिक शोषण

भाजप वॉर्ड अध्यक्ष सूरज प्रतापसिंहने केले लैंगिक शोषण

पीडितेने केला आरोप

Google News Follow

Related

दहिसर-बोरिवलीमधील भाजपा वॉर्ड अध्यक्ष सूरजप्रताप सिंह देवडा यांच्याविरोधा लैंगिक शोषणाचा आरोप ठेवण्यात आला आहे. बारमधील तरुणींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.

लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवल्याची तक्रार करण्यात आली असून विवाहित असूनही स्वतःला अविवाहित असल्याचे सांगितल्याचा आरोपही देवडा याच्यावर करण्यात आला आहे.  या नेत्याने बारमधील तरुणीला लग्न आणि सीएचे जॉब देण्याचं आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची माहिती समोर आली आहे. बारमध्ये तरुणीवर ५० हजार रुपयांच्या नोटा उडवल्याचा आणि पीडितेकडून लाखो रुपये उकळल्याचाही आरोप आहे. शिवाय, बंदूक  दाखवून धमक्या दिल्याची तक्रारीत नोंद आहे.

हे ही वाचा:

बोरिवलीत पेट्रोल पंपावर थरार

भारताकडून हार, पाकिस्तानला दंड

विजयाची घोडदौड कायम ठेवण्यासाठी भारत सज्ज

शेअर बाजारात उसळी; सेन्सेक्समध्ये ५४४ अंकांची झेप

पीडितेने असेही म्हटले आहे की, माझ्यासह अनेक मुलींचे शोषण झाले असा पीडितेचा दावा आहे. पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याची माहिती आहे. दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले असून तपास मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

प्रकरण काय आहे?

दहिसर-बोरिवलीतील वॉर्ड अध्यक्ष विरोधात बारमधील तरुणीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. यावेळी आरोपीने बारमधील तरुणीला विवाहित असूनही स्वतःला अविवाहित असल्याचे सांगितले. या तरुणीने या सर्व प्रकाराला विरोध करण्याचा प्रयत्न करताच तिला थेट बंदूक दाखवून जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. माझ्यासह अनेक मुलींचेही शोषण झाल्याचा आरोप दावाही पीडितेने तक्रारीत केला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
316,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा