संयुक्त महाराष्ट्र चळवळीत कुणाकुणाचं योगदान होतं, यावरून सातत्याने टीकाटिप्पणी करण्यात येते. प्रामुख्याने उबाठा शिवसेनेकडून, त्यांच्या प्रवक्त्यांकडून हा प्रश्न नेहमी विचारला जातो की जनसंघाचं, भाजपाचं, काय योगदान होतं त्या चळवळीत. त्या मुद्द्यावर प्रत्येकाची वेगवेगळी मतमतांतरे असतील. त्यावरून प्रत्येकजण आपापले दावे प्रतिदावेही करेल. पण त्या वादात जाण्याची आज अजिबात आवश्यकता नाही. कारण वर्तमानात काय स्थिती आहे, याला सगळ्यात अधिक महत्त्व आहे. शिवसेना उबाठाकडून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीबद्दल कितीही दावे केले तरी त्या आंदोलनाबद्दल लोकांच्या मनात आजही अभिमान आहे, कौतुक आहे. लोक तो इतिहास विसरलेले नाहीत. त्याल बलिदान दिलेल्यांबद्दल लोकांच्या मनात आदरही आहे. पण त्यावर तर आजचे राजकारण खेळता येणार नाही ना.
दुर्दैवाने उबाठा असो की काँग्रेस यांनी याच सगळ्या गोष्टींवर राजकारण करण्याचा प्रयत्न केला. वर्तमान काय आहे, काळ बदलला आहे, याचे भान त्यांना राहिले नाही. आम्ही स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी होतो त्यामुळे आताही आम्हाला त्याच आधारे निवडून द्या, असे म्हणणाऱ्यांना लोक निवडून देत नाहीत. ते काँग्रेसच्या बाबतीत घडले. राष्ट्रीय स्वंयसेवक संघ स्वातंत्र्य चळवळीत कुठे होता, असे वायफळ सवाल विचारणाऱ्यांना लोक धडा शिकवत असतात. आताचे काय ते बोला हा लोकांचा प्रश्न असतो.
गेल्या काही निवडणुकांत लोकांनी याचेच उत्तर अगदी सविस्तर दिले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपा, एनडीएला धक्का बसला हे खरे असले तरी त्यामुळे जनमानसातील विश्वासाला तडा गेलेला नाही, हे विविध राज्यांतील निवडणुकांचे आलेले निकाल सांगतात. महाराष्ट्रात तेच घडले. लोकसभा निवडणुकांत यश मिळविल्यानंतर विधानसभा निवडणुकीत मात्र महाविकास आघाडी, इंडी आघाडी यांना सपाटून मार खावा लागला. त्यानंतरच्या महानगरपालिकांच्या निवडणुकांतही तीच गत मतदारांनी या विरोधकांची केली. आणि सोमवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकातही जनतेने तेच उत्तर दिले. महायुतीला या निवडणुकातही दणदणीत यश मिळाले. यावरून आता आरोप होतील की, निवडणुकीत सगळा घोळ करण्यात आला. ईव्हीएम मशिनमध्ये गडबड होती, वगैरे वगैरे. पण किती वेळा हे कारण सांगून वेळ निभावून नेता येईल? शेवटी काम कोण करू शकेल, कुणामध्ये काम करण्याची क्षमता आहे, हे लोक पाहात असतातच.
महाराष्ट्रातील विधानसभा, मग महानगरपालिका आणि आता जिल्हा परिषदांच्या निवडणुकांत भाजपाने दणदणीत यश मिळविले. विधानसभा निवडणुकीत तर भाजपाने १३२ आमदार निवडून आणले. एवढे आमदार त्यांनी यापूर्वी कधीही जिंकले नव्हते. महानगरपालिकांच्या निवडणुकांत २९ पैकी २२ महानगरपालिकांवर भाजपाचा झेंडा फडकला. पण त्यात विशेष म्हणजे मुंबई महानगरपालिका त्यांनी जिंकली. २०१७च्या पालिका निवडणुकीत त्यांनी त्याची चुणूक दाखविली होती. पण तेव्हा एकसंध शिवसेनेने दोन नगरसेवक जास्त जिंकल्यामुळे आपलाच महापौर हवा असा हट्ट धरला. पण यावेळी भाजपाने ती महानगरपालिका त्यांच्याकडून खेचून घेतली.
त्या निवडणुकीत प्रचार काय झाला होता, तर मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार असल्याची नेहमीसारखी आवई उठविली गेली, गुजराती-मराठी असा वाद निर्माण केला गेला, मराठी माणसा जागा हो रात्र वैऱ्याची आहे, अशी भीती दाखविण्यात आली, मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक असे चित्र निर्माण केले गेले, पण हाती काय लागले? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या बंधूंना एकत्रित बरे यश मिळाले. पण पालिका हातून गेली. त्या महानगरपालिकेवर रितू तावडे या मराठी महापौर बसल्या, पण त्या भाजपाच्या. यावरून हे स्पष्ट झाले की, जनतेला इतिहास माहीत आहे, पण वर्तमानातही जगायचं आहे. केवळ इतिहास सांगून वर्तमानात काहीही न करणाऱ्यांकडे जनता ढुंकूनही बघत नाही, याचे या निवडणुका उत्तम उदाहरण आहेत. मेहनत कोण घेतोय, कष्ट कोण उपसतोय, कुणाकडे व्हीजन आहे, कोण फक्त तोंडाच्या वाफा दवडतोय, याकडे जनता अत्यंत बारकाईने पाहात असते.कुणाला निवडायचे, याचे जनतेला चांगले ज्ञान असते. तेच जनतेने, मतदारांनी केले.
महानगरपालिका निवडणुकांतही महायुतीचेच महापौर विविध ठिकाणी बसले. जिल्हा परिषदेतही भाजपाने जवळपास दोनशेपेक्षा अधिक जिल्हा परिषद सदस्य निवडून आणले. एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी यांनीही दीडशेपेक्षा अधिक जागा जिंकल्या. तिघांनी मिळून ७३१पैकी जवळपास साडेपाचशे सदस्य जिंकून आणले. महाविकास आघाडीतील तीन पक्षांना मिळून १२० सदस्य निवडता आले. हे कशाचे द्योतक आहे. यावर पुन्हा एकदा घोळ, निवडणूक आयोगाची हातमिळवणी वगैरे आरोप करता येतील पण लोकांना हे आरोप आता तोंडपाठ झालेत. त्यांनाही काम करणारे कोण आणि न करणारे कोण यातला फरक कळतो. भाजपाने या तीन्ही निवडणुकांत जे यश मिळविले ते मेहनत, संघर्ष, रणनीती या जोरावर मिळविले. भाजपा जिंकली तर मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाणार अशी भीती दाखविली जात होती. तसे होत नाही, हे मतदारांना चांगले ठाऊक आहे. म्हणून त्यांनी मुंबई महानगरपालिका भाजपाच्या हाती सोपविली आणि अवघा महाराष्ट्रही भाजपालाच दिला.
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी कुणी काय केले याचा किस काढण्यापेक्षा लोकांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र कोण जिंकू शकतो, हे दाखवून दिले. विधानसभा, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद या तिन्ही ठिकाणी नंबर वन भाजपाच ठऱला. विरोधकांमध्ये नसलेला उत्साह, तळागाळात काम करण्याची नसलेली तयारी यामुळेच त्यांना हे अपयश पाहावे लागले. उबाठा, मनसे यांनी मुंबई महानगरपालिकेत युती केली खरी पण त्यापलिकडे इतर महानगरपालिकांत त्यांची स्थिती दयनीय राहिली. मग याला निवडणूक आयोगाला जबाबदार धरायचं, ईव्हीएमवर खापर फोडायचं की, आपल्या नाकर्तेपणाला दोष द्यायचा हे ठरवायला हवं. आपले वडील चोरले, आपला पक्ष चोरला याचेच राजकारण झाले, मराठी माणसाच्या नावावर राजकारण झाले पण त्यातून विजय मिळत नसतो, हे मतदारांनी दाखवून दिले आहे.
हे ही वाचा:
२०२६-२७ मध्ये भारत जी २० देशांना मागे टाकत होणार नंबर १
एसआयआर प्रक्रियेत अडथळा खपवून घेणार नाही!
यवतमाळमध्ये गायलं गेलं पाकिस्तानी देशभक्तीपर गाणे, भाजपाकडून तक्रार
यूएईच्या रिअल इस्टेटमध्ये भारतीय गुंतवणूक वाढतेय!
महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात एका वादाला तोंड फुटले आहे. उमरखेड येथील अब्दुल गफूर शाह नगर परिषद उर्दू शाळा क्रमांक २ मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पाकिस्तानी देशभक्तीपर गाण्यावर गायन आणि नृत्य सादर करण्यात आल्याने हा वाद निर्माण झाला आहे. २६ जानेवारी रोजी झालेल्या ‘स्नेहसंमेलन’ कार्यक्रमात पाकिस्तानमध्ये लष्करी प्रेरणादायी गीत म्हणून ओळखले जाणारे “ए मर्द-ए-मुजाहिद तेरी ललकार क्या है” हे गाणे सादर करण्यात आल्याचा आरोप आहे. विद्यार्थ्यांसाठी आयोजित शैक्षणिक वातावरणात अशा प्रकारचे गाणे सादर झाल्याने देशविरोधी भावना पसरवल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे.
तक्रारदार गोपाळ कलाने यांनी या गाण्याचे वर्णन ‘जिहादी’ स्वरूपाचे असे केले असून, पाकिस्तानमध्ये त्याला राष्ट्रीय दर्जा देण्यात आला आहे आणि १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान हे गाणे वापरले गेले होते, असंही त्यांचं म्हणणं आहे. भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त साजऱ्या करण्यात आलेल्या शालेय कार्यक्रमात या गाण्यावर गायन व नृत्य सादर होणे अत्यंत गंभीर बाब असल्याचे सांगत त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी केलेली ही मोठी चूक असून, यामुळे लहान मुलांच्या मनात देशनिष्ठेबाबत संभ्रम निर्माण होऊ शकतो, असा आरोप करण्यात येत आहे. स्थानिक पातळीवरील संताप सोशल मीडियावरही उमटत असून, दोषींवर कारवाईची जोरदार मागणी होत आहे.
भाजप नेते गोपाळ कलाने यांनी उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत या घटनेला देशद्रोहाचे कृत्य ठरवले आहे. त्यांनी शाळा प्रशासनावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडेही तक्रार दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रकारच्या कृत्यामुळे राष्ट्रीय स्वाभिमानाला धक्का बसतो, यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई व्हायला हवी अशी मागणीही करण्यात आली आहे.
पोलीस तपास सुरू, जनतेत संताप
उमरखेड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. या घटनेमुळे स्थानिक पातळीवर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमधील सांस्कृतिक संवेदनशीलतेवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. कार्यक्रमाला परवानगी कशी देण्यात आली, त्यात कोण सहभागी होते, याची सखोल तपासणी केली जाणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
ही घटना खरोखरच गंभीर आहे. आपण जे कार्यक्रम सादर करतो त्यामागे नेमकी काय भूमिका आहे. मुलांना नेमके काय शिकवायचे आहे, याचे भान नको. आधीच वंदे मातरमवरून सातत्याने वाद निर्माण होत असतो. आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही, असा इशारा अनेक मुस्लिम नेते देत असतात. अशा परिस्थितीत पाकिस्तानी प्रेरणा गीत भारतात आणि तेही एका शाळेत सादर होत असेल तर त्यातून संदेश काय द्यायचा आहे, असा प्रश्न उपस्थित होतो. या शाळांमध्ये खरोखरच कोणते प्रशिक्षण दिले जाते, त्यांना देशभावना शिकविली जाते की आणखी काही शिकवले जाते याचाही विचार व्हायला हवा.







