28 C
Mumbai
Thursday, January 29, 2026
घरविशेषमुंबईतील दोन शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबईतील दोन शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी

Google News Follow

Related

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत धमकीचे फोन सतत येत असल्याने पोलीस सतर्क झाले आहेत. दोन शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तींविरोधात देवनार आणि समतानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, देवनारमधील कनाकिया इंटरनॅशनल स्कूल आणि कांदिवलीच्या समतानगर येथील रायन इंटरनॅशनल स्कूलला धमकीचे ईमेल प्राप्त झाले आहेत. अज्ञात व्यक्तीने या ईमेलमधून संबंधित शाळा तसेच मुंबई शहरात बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी दिली आहे.

मुंबई पोलिसांनी आपल्या निवेदनात सांगितले की, “तपासादरम्यान आतापर्यंत काहीही संशयास्पद वस्तू सापडलेली नाही. देवनार व समतानगर पोलीस ठाण्यांत अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धमकीमुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून, ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. याआधीही अमेरिकेच्या महावाणिज्य दूतावास कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती, ज्यामुळे प्रशासनात एकच खळबळ माजली होती.

हेही वाचा..

कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये उसळी

१९८० नंतर रुमेटॉइड आर्थरायटीसच्या प्रकरणांमध्ये का वाढ होतेय…

त्वचारोग असो वा कोंडा, बघा प्रभावी उपाय काय ?

एअर इंडियाच्या विमानात समस्या, हाँगकाँगहून दिल्लीला येणारे विमान परतले!

या प्रकरणाची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. पोलिसांनी सांगितले की, बीकेसी पोलीस ठाण्याला अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलीस अधिकारी आणि बॉम्ब शोध पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि संपूर्ण परिसराची कसून तपासणी केली. तपासादरम्यान काहीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. तसेच, याआधी ३१ मे रोजी मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलला बॉम्ब असल्याचा धमकीचा कॉल आला होता. यानंतर हॉटेल प्रशासनाने तत्काळ वाकोला पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलीस आणि बॉम्ब निवारण पथकाने घटनास्थळी जाऊन संपूर्ण परिसराची तपासणी केली. मात्र, तेथेही कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा