28 C
Mumbai
Monday, March 16, 2026
घरविशेषआकर्षक दिसण्यासाठी उंटांना केला बनावट मेक-अप

आकर्षक दिसण्यासाठी उंटांना केला बनावट मेक-अप

ओमानमध्ये कॅमेल ब्युटी शोमधून २० उंट बाद

Google News Follow

Related

ओमानमध्ये होणाऱ्या उंटांच्या सौंदर्य स्पर्धा नेहमीच चर्चेत असतात; मात्र यावेळी एका वेगळ्याच कारणामुळे ही स्पर्धा चर्चेचा विषय ठरली आहे. ओमानमधील अल मुसन्ना येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘कॅमल ब्यूटी शो फेस्टिव्हल’मध्ये यंदा २० उंटांना स्पर्धेतून अपात्र घोषित करण्यात आले. या उंटांवर सौंदर्य वाढवण्यासाठी ‘बोटॉक्स’ आणि इतर कृत्रिम उपचारांचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

माहितीनुसार, या स्पर्धेत ‘ड्रोमेडरी’ जातीचे उंट मुख्य आकर्षण असतात. ड्रोमेडरी उंटांची ओळख त्यांच्या एका कूबडामुळे आणि चार थनांमुळे होते, तर ‘लामा’ प्रजातीमध्ये साधारणपणे दोन थन असतात. या स्पर्धेत विजयी ठरणाऱ्या उंटांच्या मालकांना मोठी रोख रक्कम, महागड्या गाड्या आणि इतर आकर्षक बक्षिसे दिली जातात. त्यामुळे अनेक मालक आपल्या उंटांना अधिक आकर्षक दिसण्यासाठी कृत्रिम उपायांचा अवलंब करू लागले आहेत.

अहवालानुसार, काही उंटांचे ओठ, कूबड आणि शरीराच्या इतर भागांना अधिक उठावदार दाखवण्यासाठी ‘बोटॉक्स आणि फिलर्स’चा वापर करण्यात आला होता. उंटांच्या सौंदर्याचे मूल्यमापन करताना त्यांच्या ओठांची रचना, कूबडाची समरूपता, मानेची लांबी, चमकदार त्वचा, गडद डोळे आणि पिवळसर चमकदार दात यांसारख्या निकषांकडे विशेष लक्ष दिले जाते. त्यामुळे काही प्रजनकांनी स्पर्धेत आघाडी मिळवण्यासाठी या कृत्रिम पद्धतींचा वापर केल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारच्या उपचारांना सौंदर्य स्पर्धेत ‘डोपिंग’सारखे मानले जाते. काही श्रीमंत प्रजनक आपल्या उंटांच्या स्नायूंना मजबूत करण्यासाठी विशेष उपचारही करून घेतात. काही प्रकरणांमध्ये उंटांच्या नाकाची शस्त्रक्रियाही करण्यात आल्याचे सांगितले जाते.

हे ही वाचा:

पाकड्यांच्या अबरारवर बोली; सनरायझर्सवर बहिष्कार?

हापूरमध्ये समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्याच्या घरी सापडले ५५ सिलिंडर

दहशतवाद निधी प्रकरणात काश्मिरी फुटीरतावादी नेत्याला जामीन

भारताला केलेल्या विनंतीनंतर अमेरिकेकडून इतर देशांना रशियन तेल खरेदीची परवानगी

दुसरीकडे, महागडे उपचार परवडत नसलेल्या काही मालकांनीही विचित्र उपायांचा अवलंब केल्याचे दिसून आले आहे—उदा. हाताने उंटांचे खालचे ओठ ओढून ते अधिक मोठे दिसावेत असा प्रयत्न करणे. पशुवैद्यक आणि पशू कल्याण संस्थांनी या प्रकारांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा उपचारांमुळे उंटांमध्ये संसर्ग, सूज आणि वेदना यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. तसेच हार्मोन्समध्ये बिघाड होणे आणि वर्तनात बदल होण्याची शक्यता देखील असते. मादी उंटांमध्ये अतिप्रमाणात उपचार केल्यास वंध्यत्व येण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धा आयोजकांनी देखरेख अधिक कडक केली आहे. अनेक स्पर्धांमध्ये आता उंटांचे रक्तनमुने तपासले जातात आणि एक्स-रेसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून कोणत्याही प्रकारचे कृत्रिम सौंदर्य उपचार झालेले नाहीत याची खात्री केली जाते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
298,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा