28 C
Mumbai
Thursday, January 29, 2026
घरविशेषलाडकी बहिण योजनेला बंद कराल तर 'करेक्ट कार्यक्रम' झालाच समजा!

लाडकी बहिण योजनेला बंद कराल तर ‘करेक्ट कार्यक्रम’ झालाच समजा!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

Google News Follow

Related

महायुती सरकारकडून आज पत्रकार परिषद घेत ‘रीपोर्ड कार्ड’ प्रकाशित केले. ‘रीपोर्ड कार्ड’मध्ये महायुती सरकारच्या अडीच वर्षांचा कामाचा लेखाजोखा आहे. यावेळी महायुती सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करत महायुती सरकारच्या कामाचा पाढा वाचून दाखल अन विरोधकांवर जोरदार टीका केली. सत्तेत आल्यानंतर सर्व योजना बंद जरू असे विरोधक म्हणत आहेत, मात्र त्यांनी लक्षांत ठेवावे ‘लाडकी बहिण योजना बंद करण्याचा विचार कराल तर त्याचा ‘करेक्ट कार्यक्रम’ झालाच म्हणून समजा, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की,  महायुती सरकारने केलेल्या मागील दोन वर्षातील कामे रिपोर्टकार्डमध्ये दाखविली आहेत. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या दोन वर्षीय कामाची तुलना केली तर सर्व स्पष्ट होईल. मविआने आपल्या कालावधीत सर्व प्रकल्प बंद करण्याचे काम केले. मात्र, आम्ही बंद केलेली सर्व कामे चालू केली. आमच्या सरकारमुळे नक्षलग्रस्त भाग गडचिरोलीत देखील इंडस्ट्री पोहोचली. मोठ्या प्रमाणात नोकऱ्या निर्माण होत आहेत, लोकांना काम मिळत आहेत. उद्योग महाराष्ट्राबाहेर पळाले नाहीत तर लाखो कोटी रुपयांचे प्रकल्प राज्यात होत आहेत. मात्र, यावरून विरोधक खोटे बोलत आहेत, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

उद्धव ठाकरेंचे नाव न घेता मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, विरोधकांनी एक व्हिडीओ तयार केला आहे, ज्यामध्ये त्यांनी सर्व खोटे सांगितले आहे. हा व्हिडीओ बनवताना शुद्धीमध्ये होते की नाही काय माहिती. कोण काय बोलतय, कोणता संबंध कुठे जोडतील याचा काही नेम नाही. एका भाषणात तर गाईचा संबंध मराठी भाषेवरून जोडला गेला, असा टोला शिंदेनी उद्धव ठाकरेंना लगावला. लोकसभेला जनता फसली मात्र, आता जनता फसणार नाही, ते पुढे म्हणाले.

हे ही वाचा : 

सीमेपलीकडील दहशतवाद दोन देशांमधील व्यापार आणि संबंधांमध्ये अडथळा आणतात

नायब सिंग सैनी दुसऱ्यांदा घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ!

एकीकडे विरोधकांचा योजनेसाठीच्या पैशांवर सवाल; दुसरीकडे योजनेची रक्कम वाढवण्याचं आश्वासन

ओमर अब्दुल्ला यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ!

कॉमनमॅनला आम्हाला सुपरमॅन बनवायचे आहे, महिलांना, बहिणींना सशक्त करायचे आहे. लोकसभेला जनता फसली मात्र, आता जनता फसणार नाही. आमच्या सरकारने ९०० हून अधिक निर्णय घेतले आहेत. ६०-७० कॅबिनेट बैठका पार पडल्या आहेत. विरोधक आमच्या योजना बंद करणार म्हणतात, पोलखोल करणार म्हणतात, तुरुंगात टाकणार म्हणत आहेत. आमची लाडकी बहिण योजना बंद करणार म्हणत आहेत, जर लाडकी बहिण योजनेला बंद करायला गेलात तर त्यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ झालाच म्हणून समजा, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे नाव न घेता मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, देशाबाहेर जाऊन एक जन देशाची बदनामी करत आहे, तर इथले विरोधक राज्याची बदनामी करत आहेत. आपल्याला देशाचा अभिमान असला पाहिजे. आमच्याकडे कोणी काही काम घेवून आले की आम्ही लगेच सही करतो, पण मागील सरकार पेन पण काढत न्हवते, पेन ठेवताच न्हवते, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. कामाचे रीपोर्ड कार्ड देण्यासाठी देखील डेरिंग लागते, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा