“टिकटॉक भारतात परतलं?”

सरकारने फेटाळले सोशल मीडियावरील दावे

“टिकटॉक भारतात परतलं?”

गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर असा दावा केला जात होता की चीनची प्रसिद्ध अ‍ॅप टिकटॉक पुन्हा भारतात सुरु झाली आहे. काही वापरकर्त्यांनी टिकटॉक आणि अलीएक्सप्रेसच्या वेबसाइट्स भारतात उघडत असल्याचे सांगितले आणि यावरून चर्चेला उधाण आले. मात्र, केंद्र सरकारने हे वृत्त स्पष्टपणे फेटाळून लावले असून, टिकटॉकवरील बंदी अद्याप कायम असल्याचे स्पष्ट केले आहे.

काही वापरकर्त्यांना TikTok आणि AliExpress च्या वेबसाइट्स भारतात उघडता आल्यामुळे अफवा पसरल्या. मात्र हे तांत्रिक कारणामुळे झाले असून, टिकटॉकने भारतात पुन्हा प्रवेश केला आहे, असे समजणे चुकीचे असल्याचे तंत्रज्ञान तज्ज्ञांनी सांगितले आहे.

माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, “सरकारने टिकटॉक किंवा अलीएक्सप्रेससाठी कोणतीही परवानगी दिलेली नाही. बंदी अद्याप लागू आहे.” सोशल मीडियावर फिरणाऱ्या बातम्या “खोट्या आणि भ्रामक” आहेत, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

या प्रकरणावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेस प्रवक्त्यांनी आरोप केला की, “सरकार चीनसोबत सौदा करत आहे. हे शहीद जवानांचा अपमान आहे.

हे ही वाचा : 

ट्रम्प यांचे निष्ठावंत सहाय्यक सर्जियो गोर भारतातील अमेरिकेचे राजदूत

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी

नाफेड गो बॅक – पोळ्यादिवशी शेतकऱ्यांचा अनोखा निषेध

उत्तराखंड : चमोलीमध्ये ढगफुटी, अनेक घरांत चिखल

टिकटॉकवर भारतातील बंदी

२०२० मध्ये लडाखमध्ये भारत-चीन दरम्यान तणावाच्या पार्श्वभूमीवर टिकटॉकसह ५९ चायनीज अ‍ॅप्सवर भारत सरकारने बंदी घातली होती. तेव्हापासून ही बंदी आजतागायत कायम आहे. टिकटॉक अजूनही Google Play Store किंवा Apple App Store वर भारतात उपलब्ध नाही.

Exit mobile version